जळगाव : राज्य सरकार दहावी आणि बारावीच्या परीक्षा ऑफलाईन घेणार या अफवेने जळगावात विद्यार्थ्यांनी एकत्र येत जिल्हाधिकारी कार्यालय आवारात आंदोलन केले. यावेळी ऑफलाईन परीक्षेविरोधात घोषणाबाजी केली. (jalgaon news hindustani bhau viral msg Students take to the streets)
सोशल मीडियावर (Social Media) दहावी आणि बारावीची परीक्षा राज्य सरकार ऑनलाईन घेणार असल्याची अफवा हिंदुस्थानी भाऊ (Hindustani Bhau) नामक तरुणाने पसरली होती. या विरोधात विद्यार्थ्यांनी एकत्र यावे; असे आवाहनही केले होते. त्यामुळे विद्यार्थी एकत्र आल्याचे आंदोलनात सहभागी तरूणांनी सांगितले.
मग परीक्षा ऑफलाइन का?
दहावी, बारावीच्या परिक्षांची तारीख जाहीर झालेली आहे. मात्र यंदा सर्वच वर्ग ऑनलाईन झाले आहेत. मग परिक्षा ऑफलाईन का? असा प्रश्न उपस्थीत करत परिक्षाही ऑनलाईन घेण्यात याव्या; या मागणीसाठी आज असंख्य दहावी, बारावीचे विद्यार्थी रस्त्यावर उतरले होते.
पोलिसांची अडवणूक अन् अनेकांनी हुल्लडबाजी
जळगाव (Jalgaon) शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून महाविद्यालयीन युवक जिल्हाधिकारी कार्यालयावर (Jalgaon Collector Office) आले. तेथे भारत माता की जय’च्या घोषणा देत दहावी, बारावीच्या परिक्षा ऑनलाईनच घेण्यात याव्यात अशा घोषणा देण्यात आल्या. पोलिसांनी या युवकांना जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर अडविल्यानंतर अनेकांनी हुल्लडबाजी केली. चित्रविचीत्र आवाज काढले. यामुळे या मार्गाने जाणारे वाहन धारकही थांबून आंदोलन पहात होते.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.