Jalgaon Rain Saam tv
महाराष्ट्र

Rain Update: जळगावात दमदार पाऊस; पिकांसाठी होणार फायदा

जळगावात दमदार पाऊस; पिकांसाठी होणार फायदा

साम टिव्ही ब्युरो

जळगाव : तब्बल पंधरा दिवसांपासून पाठ फिरविलेल्या मान्सूनने जळगाव शहरात दमदार हजेरी लावली. रविवारी संध्याकाळी (Heavy Rain) जोरदार तर आज सकाळी तुरळक स्‍वरूपात हजेरी लावली. पंधरा मिनिटाच्‍या दमदार पावसामुळे जळगाव शहरातील अनेक रस्‍त्‍यांवर पाणी साचले होते. (Jalgaon Rain Update)

अनेक दिवसांपासून प्रचंड उकाड्याने हैराण असलेल्या (Jalgaon) जळगावकरांना दमदार पावसामुळे दिलासा मिळाला आहे. दरम्यान जळगाव जिल्ह्यात (Jalgaon Rain) आगामी तीन दिवस मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा अंदाज भारतीय हवामान खात्याकडून वर्तविण्यात आला आहे. जिल्ह्यात व जळगाव शहरातदेखील जुलै महिन्यात दमदार पावसाने हजेरी लावल्यानंतर ऑगस्टमध्ये एकूण सरासरीपेक्षा कमीच पाऊस झाला होता. त्यात सप्टेंबर महिना सुरू झाल्यानंतर देखील पहिल्या आठवड्यात ठराविक तालुक्यांमध्येच किरकोळ हजेरी लावली होती.

पिकांना होणार फायदा

एकीकडे तापमानात वाढ व वातावरणात मोठ्या प्रमाणात आर्द्रता वाढल्यामुळे मोठ्या प्रमाणात उकाड्यातदेखील वाढ झाली होती. तसेच पावसाने पाठ फिरवल्यामुळे कापूस, सोयाबीन या पिकांनादेखील मोठा फटका बसण्याची भीती व्यक्त केली जात होती. मात्र, वातावरणात अचानक बदल होऊन ढगांचा गडगडाट व विजांच्या कडकडाटासह दमदार पावसाने शहर व तालुक्यातील अनेक भागात हजेरी लावल्याने शेतकऱ्यांची चिंता मिटली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Cough Syrup: कफ सिरपनं घेतला आणखी एकाचा जीव; दोन चमचे औषध प्यायल्यानंतर महिलेनं सोडला जीव, रुग्णालयातच घडला धक्कादायक प्रकार

Microwave: मायक्रोवेव्हमध्ये अन्न गरम केल्याने होतात 'हे' परिणाम

Shocking : धक्कादायक! दारुच्या नशेत ५ जणांचा घरात घुसून महिलेवर सामूहिक अत्याचार

Dombivli News : डोंबिवलीत खांदेरी-उंदेरी किल्ल्यांची भव्य प्रतिकृती; स्वराज्य ग्रुपचा उपक्रम ठरला आकर्षणाचा केंद्रबिंदू

Gold and Silver: भारतीय सराफ बाजारात होणार भूकंप; सोने-चांदीच्या किमतींमध्ये मोठी घसरण

SCROLL FOR NEXT