Jalgaon Crime Saam tv
महाराष्ट्र

Jalgaon Crime: जळगावात सराफ दुकान फोडले; ११ लाखाचे दागिने केले लंपास

Jalgaon News ; २१ नोव्हेम्बरला काम केल्यानंतर नेहमीप्रमाणे दुकान मालक रात्री साडेआठला घरी निघून गेले. यानंतर दहा वाजेच्या दरम्यान सव्र्ह कारागीर देखील गेले

संजय महाजन

जळगाव : जळगावच्या सुवर्ण बाजारमधील शनिपेठ परिसरात सराफा दुकानाचे शटर तोडून अज्ञात चोरट्यांनी ११ लाखाचे सोने लंपास केले. (Jalgaon) दरम्यान सराफा दुकान फोडणारे चार चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले असून याप्रकरणी सराफा व्यावसायिक किशोर वर्मा यांच्या फिर्यादीवरून अज्ञात (Crime News) चोरट्यांविरुद्ध शनिपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Latest Marathi News)

जळगाव शहरातील सराफ बाजार प्रसिद्ध आहे. सराफ बाजार काम करणारे सर्व कामगार बंगाली आहेत. चार कामगार तीन- चार महिन्यांपूर्वी गावी निघून गेले आहेत. किशोर वर्मा यांनी त्यांच्याकडे काम करणारा कारागीर मिलन चित्तरंजन पाकिरा याला दोन ते तीन दिवसांपूर्वी १०० ग्रॅम तर सुधार मदन सामंत याच्याकडे १०० ग्रॅम तर सुशांत राधानाथ मायती याच्याकडे ४८ ग्रॅम सोन्याचे दागिने तयार करण्यासाठी दिले होते. दरम्यान २१ नोव्हेम्बरला काम केल्यानंतर नेहमीप्रमाणे दुकान मालक रात्री साडेआठला घरी निघून गेले. यानंतर दहा वाजेच्या दरम्यान सव्र्ह कारागीर देखील गेले. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सीसीटीव्हीद्वारे चोरट्यांचा शोध

हा प्रकार दुसऱ्या दिवशी पहाटे साडेचारच्या सुमारास किशोर वर्मा यांना त्यांच्या दुकानाजवळ राहणाऱ्या अनिल वर्मा यांनी दुकानात चोर घुसल्याची माहिती दिली. त्यानुसार वर्मा हे वडील व मोठ्या भावाला घेऊन तत्काळ दुकानावर आले. यावेळी त्यांना दुकानाचे लहान शटर तुटलेले आढळले. सीसीटीव्ही तपासले असता यार चोरटे दिसून येत आहेत. या सीसीटीव्हीच्या माध्यमातून चोरट्यांचा शोध सुरु आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chhatrapati Shivaji Maharaj forts: छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रत्येक किल्ल्यावर भगवान शिवाचं मंदिर का होतं?

फक्त आमदारकी रद्द करण्यासाठी रात्री 10.30 वाजता सुरु केलं सचिवालय, काँग्रेसच्या बड्या नेत्यावर कारवाई! नेमकं काय घडलं?

Maharashtra Live News Update : नागोठणे येथे बस अपघात; २ ठार, २२ जखमी

CBI Action: ४ बड्या अधिकाऱ्यांना अटक, लाच घेताना रंगेहाथ पकडलं; CBI ची मोठी कारवाई

Sanjay Dutt Restaurant: 'जिवंत माशांचे' कॉकटेल; संजय दत्तच्या रेस्टॉरंटमध्ये विचित्र मेन्यू

SCROLL FOR NEXT