Union Budget 2024 Impact on Gold Price Saam TV
महाराष्ट्र

Budget 2024 Impact : बजेटनंतर लगेच सोनं झालं स्वस्त; जळगावात ₹ २५००, तर पुण्यात ३००० रुपयांनी घसरला!

Gold price decrease after budget 2024: केंद्रीय अर्थमंत्री अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज अर्थसंकल्प जाहीर केला. या अर्थसंकल्पात सोने खरेदी करण्यासाठी दिलासा मिळाला आहे.

Rajesh Sonwane

जळगाव/पुणे : केंद्र सरकारचा आज अर्थसंकल्प जाहीर करण्यात आला. यात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सहा टक्के कस्टम ड्युटी कमी केल्यामुळे सोन्याच्या दरात लागलीच घसरण झाल्याचे पाहण्यास मिळाले. जळगावच्या सराफ बाजारात सोन्याचे दर २ हजार ५०० रुपयांनी कमी झाले आहेत. तर पुण्यामध्ये हेच दर तब्बल ३ हजार रुपयांनी कमी झाले आहेत.

केंद्रीय अर्थमंत्री अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज अर्थसंकल्प (Union Budget) जाहीर केला. या अर्थसंकल्पात सोने खरेदी करण्यासाठी दिलासा मिळाला आहे. सोने- चांदीवर आधी १० टक्के कस्टम ड्युटी होती. तर प्लॅटिनमवर आधी इम्पोर्ट ड्युटी १५ टक्के होती. मात्र निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प जाहीर करताना सोन्यावर लागणारी कस्टम ड्युटी ६ टक्क्याने कमी करण्याची घोषणा केली. हि घोषणा झाल्यानंतर लागलीच सोन्याच्या दरात घसरण झाल्याचे पाहण्यास मिळाले. यामुळे (Jalgaon) जळगावच्या बाजारात सोन्याचे भाव हे २५०० रुपयांनी कमी झाले आहेत. जळगावच्या सराफ बाजारात २२ जुलैला सोन्याचे भाव प्रति १० ग्रामला ७३ हजार ३०० रुपये इतके होते. यानंतर आज हेच दर ७० हजार ५०० रुपये इतके खाली आले आहेत. (Gold Price) सोन्याचे भाव कमी झाले असून ग्राहकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

पुण्याच्या बाजारात ३ हजारांची घसरण 

सोने आणि दागिने खरेदी करणाऱ्या नागरिकांसाठी आनंदाची बातमी आली आहे. अर्थसंकल्प जाहीर झाल्यानंतर पुण्याच्या सराफ बाजारात देखील दर कमी झाल्याचे पाहण्यास मिळाले. सोने आणि चांदीवरील कस्टम ड्युटी ६ टक्के आणि प्लॅटिनमवर ड्युटी ६.४ टक्के केली. यामुळे पुण्याच्या बाजारात सोन्याच्या भावात तीन हजार रुपयांनी घसरण झाली आहे. दर कमी झाल्याचे समजताच अनेकजण सुवर्ण पेढ्यांमध्ये खरेदीसाठी येत असल्याचे पाहण्यास मिळत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: गोदावरीला महापूर; नांदूर-माध्यमेश्वर धरणातून 94 हजार क्यूसेक विसर्ग, निफाड-सिन्नर मार्ग बंद

Health Care: जेवल्यानंतरही सतत काहीतरी खावंसं वाटतं? 'या' ७ कारणांमुळे वाढू शकते भूक

पावसाळ्यात मिळणारी कुसरा रानभाजी एकदा तरी खा; जाणून घ्या सोपी गावरान रेसिपी

shahabuddin resignation : एक कथित कॉल आणि राष्ट्रपतींचा तडकाफडकी राजीनामा; बांगलादेशच्या राजकारणात खळबळ

आषाढी एकादशी स्पेशल! नाश्त्यासाठी झटपट बनवा उपवासाचे स्टफ अप्पे

SCROLL FOR NEXT