Jalgaon News Saam tv
महाराष्ट्र

Jalgaon News: धक्‍कादायक..अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार; सात तरुणांसह इतर तीन ताब्यात

धक्‍कादायक..अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार; सात तरुणांसह इतर तीन ताब्यात

साम टिव्ही ब्युरो

पाचोरा (जळगाव) : शहरातील चौदा वर्षीय मुलीचा तरुणांनी विनयभंग करत शारीरिक संबंध प्रस्थापित (Pachora) केल्याने पीडित मुलीला गर्भधारणा झाल्याने खळबळ उडाली आहे. या अमानुष व अमानवी घटनेमुळे शहराच्या नैतिकतेला व वैभवाला काळिमा फासला गेला आहे. (Latest Marathi News)

पाचोरा शहरातील या धक्‍कादायक प्रकरणात पीडित मुलगी २७ एप्रिलला घरातून काही न सांगता निघून गेल्याने तिच्या आजीने नात बेपत्ता झाल्याचे पोलिसांना सांगितले होते. पोलिस उपनिरीक्षक विजया वसावे यांनी तिचा शहरभर शोध घेतला असता ती २८ एप्रिलला भडगाव रोड भागातील एका हॉटेलमध्ये जेवण करताना आढळून आली. (Police) पोलिसांनी तिला ताब्यात घेऊन चौकशी करून तिला जळगाव येथे बालकल्याण समितीकडे रवाना केले होते. तेथील यंत्रणेने तिची वैद्यकीय तपासणी केली असता ती गर्भवती असल्याचे निदान झाल्याने समितीने पाचोरा पोलिसांना माहिती कळवली.

उपनिरीक्षक विजया विसावे यांनी जळगाव येथे जाऊन युवतीची सखोल चौकशी केल्यावर तिने आपबीती कथन केली. पीडितेने संशयित सुमीत कश्यप, संकेत साठे, आकाश वाघ, गणेश भोई, जतिन चनाडे, अतुल महाजन, योगेश पाटील या सात तरुणांनी वेळोवेळी विनयभंग करीत शारिरिक संबंध प्रस्थापित केल्याचे सांगितले.

घटनास्थळ आणि घटनेतील संशयितांची ओळख पटविण्यासाठी पीडितेला पाचोरा येथे आणले असता तिने सातही तरुणांची ओळख पटवली. पीडिता अल्पवयीन असल्याने तिच्या ६५ वर्षीय वृद्ध आजीने पोलिसात तक्रार दिली. त्याआधारे पोलिसांनी विनयभंग, सामूहिक बलात्कार आदी कलमांसह पोस्को अंतर्गत सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, त्यांच्यासह आणखी तीन जणांना ताब्यात घेतले आहे. उपविभागीय पोलिस अधिकारी अभयसिंग देशमुख तपास करीत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

दहावीच्या पेपर तपासणीचा मोठा घोटाळा; कुठे घडलाय हा धक्कादायक प्रकार? VIDEO

Maharashtra Live News Update: निलंगा बस डेपोत उभ्या असलेल्या बसने घेतला पेट

मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या नावे रमाई आवास योजनेत घोटाळा; फडणवीसांच्या नावाचं बनवलं चक्क आधार आणि रेशनकार्ड

रत्नागिरीला भूकंपाचा हादरा; घाबरून लोक घराबाहेर पळाले

LPG Crisis : 'गॅस' भडका शमवण्यासाठी ओतणार 'रॉकेल'; टंचाईवर काढला तोडगा, सरकारनं घेतले २ महत्वाचे निर्णय

SCROLL FOR NEXT