Jalgaon Ganesh Festival Saam tv
महाराष्ट्र

चांगली बातमी..बाप्पाची भक्ती अन्‌ तुटल्‍या धर्माच्या भिंती, मुस्लिम मुलाने दिलेल्या मूर्तीची प्रतिष्ठापना

चांगली बातमी..बाप्पाची भक्ती अन्‌ तुटल्‍या धर्माच्या भिंती, मुस्लिम मुलाने दिलेल्या मूर्तीची शाळेत प्रतिष्ठापना

साम टिव्ही ब्युरो

जळगाव : श्रद्धा अन्‌ भक्तीत जाती-धर्माच्या भिंती कधीच आड येत नाही, म्हणूनच की काय मुस्लिम धर्मात अल्लाहचे रूप निरंकारी व मूर्ती हा प्रकार निषिद्ध असताना, एका मुस्लिम बालकाने शाळेत प्रतिष्ठापना (Ganesh Festival) करण्यासाठी म्हणून स्वत: मूर्ती भेट देत सामाजिक एकोप्याची प्रचिती दिली. (Jalgaon News Ganesh Festival)

माहेश्वरी विद्याप्रसारक संस्थेच्या (Jalgaon) अभिनव माध्यमिक विद्यालयात इयत्ता नववीतील अयान मझहर खान पठाण या विद्यार्थ्याने (Student) हा आदर्श घालून दिला. शाळेत याआधी शिक्षक आणि मुले-मुली वर्गणी करून उत्सव साजरा करीत. या वर्षी मुख्याध्यापक सरोज तिवारी यांनी वर्गणी न घेता शिक्षक-पालक-विद्यार्थी सहभागातून उत्सव साजरा करायचे ठरविले.

पालकही झाले तयार

नववीच्या वर्गशिक्षिका नीता पाटील यांनी वर्गातील मुला-मुलींना उत्सवाची संकल्पना सांगितली. गणेशाची मूर्ती कोण देणार, असे विचारले. त्यावर अयानने ‘मॅम मी मूर्ती देतो’, असे सांगितले. त्याच मूर्तीची वाजत-गाजत मिरवणूक निघाली. गणेशाच्या मिरवणुकीत शाळेतील मुलींचे लेझीम पथक होते. अयानने वडील मझहर खान पठाण व अम्मीला शाळेतील संकल्पना सांगितली. पालकांना संकल्पना आवडली व तेही मूर्ती द्यायला तयार झाले.

मूर्तिकारही मुस्लिम

शाळेत गणेशाची मूर्ती द्यायची तर ती आणावी लागेल. मझहर खान यांचे नातेवाईक अयुबखान ताजखान पठाण जळगावमधील सुप्रसिद्ध मूर्तिकार. चंदूलाल रसवंतीवाले यांच्याकडे गेली २० ते २२ वर्षे वेगवेगळ्या देवादिकांच्या मूर्तीचे आणि त्यावर रंगकाम करीत आहेत. अयानला गणेशाची मूर्ती हवी हे कळल्यानंतर त्यांनी गणेशाची आकर्षक मूर्ती तयार करून दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Blouse Designs: लग्नासाठी ब्लाऊज शिवताय? मग हे 5 ट्रेडिंग पॅटर्न नक्की ट्राय करा

Rohit Sharma: हिटमॅन नाही आता ‘डॉक्टर’ रोहित शर्मा! भारताच्या माजी कर्णधाराला मानद डॉक्टरेट

Pune Accident: पुण्यात भयंकर अपघात! ५ वर्षांच्या चिमुकल्याला भरधाव कारने चिरडलं, थरारक VIDEO व्हायरल

Buldhana Accident : धावत्या बसचा अचानक ब्रेक फेल झाला, ३० प्रवाशांचा जीव टांगणीला ; चालकाने थेट...

Maharashtra Live News Update: महाड नगर परिषद राडा प्रकरण, विकास गोगावले महाड पोलिसांसमोर शरण

SCROLL FOR NEXT