fraud marriage 
महाराष्ट्र

दिडलाखांत मिळवलेली नवरी पसार; नवरदेव बसला वाट पाहत

दिडलाखांत मिळवलेली नवरी पसार

साम टिव्ही ब्युरो

जळगाव : लग्न लावून फसवणूक करणाऱ्या टोळीला स्थानिक गुन्हेशाखेला अटक करण्यात आली आहे. जळगावच्या कांचन नगरातून गोकुळ रविंद्र सोनार (वय ३०) आणि सोनाली गोकूळ सोनार (वय २८, दोन्ही रा. साकेगाव ता. भुसावळ) असे अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. (jalgaon-news-fraud-marriage-and-jewellery-passed-away-police-arrested-two-parson)

लग्नासाठी समाजात मुलगी मिळत नसल्याने शिंदी (ता. भडगाव) येथील २८ वर्षीय तरूणाच्या कुटूंबीयांना दिड लाखांत नवरी मिळवुन देण्याचा प्रस्ताव देत सोनाली गोकुळ सोनार, गोकूळ रविंद्र सोनार (दोघ. रा. साकेगाव ता. भुसावळ, आशा नानासाहेब निकम रा. नाशिक), अशोक वीरसिंग खाडे (रा. मालदा ता. शहादा जि.नंदुरबार) आणि गुड्डीबाई समाधान शिंपी (रा. गाळण ता. पाचोरा) यांनी भेट घेवून तरूणाचा विश्वास संपादन करून आमच्या ओळखीची मुलगी असल्याचे सांगितले. त्यासाठी दीड लाख रूपये खर्च करावे लागतील. त्यानुसार तरूणाच्या कुटुंबियांनी लग्नासाठी होकार दिला आणि (ता.३० ऑगस्ट २०२१) रोजी नशिराबाद येथील एका तरूणीशी लग्न लावून दिले.

अन्‌ नवविवाहिता आलीच नाही

तरूणासोबत नवविवाहिता राहिल्यानंतर ही भुसावळ येथे जावून येते असे सांगून सोबत दागिने घेवून भूसावळ येथून पसार झाली होती. बरेच दिवस उलटूनही नवरी परत येत नसल्याने तपास केला असता आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तरूणाने भडगाव पोलीस ठाण्यात धाव घेतली. नवरीसह सहा जणांवर भडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गंडवुन जळगावात लपले

गुन्हा दाखल झाल्यानंतर संशयित आरोपी हे जळगाव शहरात असल्याची गोपनिय माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांना माहिती मिळाली, त्यानुसार बुधवारी (८ डिसेबर) रोजी दुपारी पथकातील उपनिरीक्षक अमोल देवढे, लक्ष्मण पाटील, विनोद पाटील, रणजित जाधव, किशोर राठोड, ईश्वर पाटील यांनी कारवाई करत संशयित आरोपी गोकुळे रविंद्र सोनार (वय ३०) याला तालुक्यातील इदगाव येथून तर सोनाली गोकूळ सोनार (वय २८) हिला कांचन नगरातून अटक केली आहे. दोघांना भडगाव पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Skin Care : तुम्हालाही चेहऱ्यावर नैसर्गिक ग्लो हवाय? मग 'हा' फेसपॅक नक्कीच ट्राय करुन बघा

Pune Tourism : मराठ्यांच्या शौर्याचे साक्षीदार पुण्यातील 'हे' ८ किल्ले, करा इतिहासाची उजळणी

Shocking: सॉरी मम्मी-पापा! ३ सख्ख्या बहिणींची आत्महत्या, मध्यरात्री ९ व्या मजल्यावरून मारल्या उड्या, कारण वाचून शॉक बसेल

Rosemary Oil For Hair: लांब आणि दाट केसांसाठी लावा रोझमेरी तेल, आठवडाभरातच दिसेल फरक

Lagnanantar Hoilach Prem : "लग्नानंतरचे प्रेम दिसेल..."; जीवा-नंदिनी अन् काव्या-पार्थच्या नात्याची होणार नवीन सुरुवात, पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT