Jalgaon News Saam tv
महाराष्ट्र

Jalgaon News : अपक्ष उमेदवाराच्या घरावर गोळीबार; घटनेने जळगाव शहरात खळबळ

Jalgaon News : जळगाव शहर मतदारसंघात महाविकास आघाडी व महायुतीच्या उमेदवारांसह तब्बल २९ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत. यामुळे चुरस अधिक वाढली आहे.

संजय महाजन

जळगाव : विधानसभा निवडणुकीच्या जळगाव शहर मतदारसंघात रिंगणात उतरलेल्या अपक्ष उमेदवाराच्या घरावर आज भल्या पहाटेच्या सुमारास गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. या घटनेने जळगाव शहरात खळबळ उडाली असून पोलिसांकडून या घटनेचा पसंत करण्यास सुरवात करण्यात आली आहे. 

विधानसभा निवडणुकीचा (Vidhan Sabha Election) रणसंग्राम आता अंतिम टप्प्यात आहे. निवडणुकीसाठी आज प्रचाराचा अखेरचा दिवस असल्याने रिंगणात उभ्या असलेल्या उमेदवारांकडून प्रचार व गाठीभेटी घेण्यावर अधिक भर आहे. दरम्यान (Jalgaon) जळगाव शहर मतदारसंघात महाविकास आघाडी व महायुतीच्या उमेदवारांसह तब्बल २९ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत. यामुळे चुरस अधिक वाढली आहे. यातच आजच्या प्रचाराच्या शेवटच्या दिवशी शहरातील मेहरूण परिसरात आज अपक्ष उमेदवार अहमद हुसेन शेख यांच्या घरावर गोळीबार झाल्याने खळबळ उडाली आहे. 

अपक्ष उमेदवार अहमद हुसेन शेख यांचे मेहरूण परिसरातील शेरा चौकात घर आहे. पहाटे चार वाजेच्या सुमारास त्याच्या घरावर अज्ञातांनी गोळीबार केला. गोळीबार झाल्यानंतर प्रचंड खळबळ उडाली असून घटनास्थळी प्रचंड गर्दी जमली होती. अहमद हुसेन यांचे समर्थक तसेच समाजातील प्रतिष्ठीत नागरिक देखील घटनास्थळी हजर झाले होते.

घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनेचा संपूर्ण पंचनामा केला असून गोळीबार करणाऱ्यांचा शोध सुरु केला आहे. अपक्ष उमेदवाराला पोलीस संरक्षण देण्यात येणार आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT