Fire 
महाराष्ट्र

औषधी दुकानाला भिषण आग; लाखोची औषधी खाक

औषधी दुकानाला भिषण आग; लाखोची औषधी खाक

संजय महाजन

जळगाव : शहरातील मु. जे. महाविद्यालय समोरील समर्थ कॉलनी परिसरातील वेणू फार्मसी या औषधी दुकानाला रविवारी रात्री उशिरा अचानक आग लागली. यात मोठे नुकसान झाले असून अग्निशामक दलाचे दोन बंबांच्‍या सहाय्याने वीस मिनिटात आग विझविण्यात आली. मात्र तोपर्यंत दुकानातील ८ ते १० लाख रुपयांची औषधी जळून खाक झाली होती. (jalgaon-news-Fierce-fire-at-drug-store-Millions-of-medicinal-dust)

मु. जे. महाविद्यालय परिसरातील समर्थ कॉलनीत रविवारी रात्री सव्वा अकराच्‍या सुमारास वेणू फार्मसी या दुकानाला अचानक आग लागली. शॉर्टसर्किटमुळे आग लागली आहे. अग्निशमन दलाचे बंब तातडीने दाखल झाल्यामुळे मोठी दुर्घटना टळली. दुकान मालक मिलिंद आनंद चौधरी (रा. दांडेकरनगर) यांनी दिलेल्या सदर माहितीनुसार रात्री सव्वा अकरा वाजता मेडिकलमध्ये अचानक शॉर्टसर्किट होऊन ही आग लागली.

आठ– दहा लाखाचे नुकसान

बाहेर धूर व आगीचे लोळ येत असल्याचे लक्षात आल्यानंतर नागरिकांनी अग्निशमन दल व मालक चौधरी यांना फोन करून माहिती दिली. अवघ्या दहा ते पंधरा मिनिटात महाबळ व गोलाणी मार्केट येथील अग्निशामक दलाचे दोन बंब तातडीने दाखल झाले. वीस मिनिटात आग विझविण्यात आली; मात्र दुकानातील आठ ते दहा लाख रुपयांची औषधी जळून खाक झाली होती. अग्निशमन दलाचे युसूफ पटेल, निवांत इंगळे, मोहन भाकरे, सोपान जाधव, पन्नालाल सोनवणे, राजमल पाटील आदींनी आग विझवली. वेळीच आग विझविण्यात आल्याने शेजारील दुकानांचे नुकसान झाले नाही. बारा वाजेपर्यंत दुकानातून धूर निघतच होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: प्रकाशा बॅरेजची पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी पाण्याचा विसर्ग सुरू

Child Safety Alert : कफ सिरप प्यायल्याने ६ चिमुकल्यांचा मृत्यू; २ औषधांवर तात्काळ बंदी, धक्कादायक कारण समोर

Rakhi Sawant: 'डोनाल्ड ट्रम्प माझे खरे बाबा', आईनं शेवटच्या पत्रात लिहिलं होतं...; राखी सावंत पुन्हा बरळली

Chilli Burn Relief: हिरवी मिरची चिरल्यावर हात जळतात? 'हे' घरगुती सोपे उपाय करून आराम मिळवा

Vaibhav Suryavanshi Century : १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीची कमाल; ऑस्ट्रेलियात तडाखेबंद शतक ठोकून रचला इतिहास

SCROLL FOR NEXT