Lightning Strike Saam tv
महाराष्ट्र

Lightning Strike : वीज पडून शेतकऱ्याचा मृत्यू; जळगाव तालुक्यातील घटना, निमखेडी शिवरातही पडली वीज

Jalgaon News : दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास अचानक पाऊस सुरु झाला. यामुळे शेतात अडोश्याला उभे असताना अस्वार यांच्या अंगावर वीज कोसळली

Rajesh Sonwane

जळगाव : जळगाव शहरासह परिसरात मंगळवारी दुपारी विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाचे आगमन झाले. तासाभराच्या पावसाने संपूर्ण परिसरात पानीचपणी झाले होते. या दरम्यान जळगाव तालुका परिसरात दोन ठिकाणी वीज पडल्याची घटना घडली असून यात एका घटनेत शेतात काम करत असलेल्या शेतकऱ्याच्या अंगावर वीज पडून जागीच मृत्यू झाल्याची घटना शिरसोली शिवारात घडली. 

शिरसोलीच्या नायगाव शिवारातील आपल्या शेतात त्र्यंबक ओंकार अस्वार (वय ६८) हे शेतात काम करीत होते. या दरम्यान दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास अचानक पाऊस सुरु झाला. यामुळे शेतात अडोश्याला उभे असताना अस्वार यांच्या अंगावर वीज (Lightning Strike) कोसळली. यात अस्वार हे जवळपास २० फुटांपर्यंत फेकले जाऊन त्यांचा जागीच मृत्यू झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. त्र्यंबक आस्वार यांच्या अंगावर वीज कोसळल्याचे शेतातील एका मेंढपाळाने बघितले. तो मदतीसाठी धावला. मेंढपाळाच्या आरोळ्यांनी आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी (Farmer) मदतीला धाव घेतली. तत्काळ बैलगाडीतून अस्वार यांना शासकीय रुग्णालयात नेले. येथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. 

जळगाव शहरातही पडली वीज 

याच वेळी जळगाव (Jalgaon) शहरातील द्वारका नगर परिसरात देखील वीज पडल्याची घटना घडली. चार वाजेच्या सुमारास द्वारकानगरातील एका घरावर वीज पडल्याने घराच्या भिंतीचा भाग कोसळला आहे. तसेच घराजवळील लिंबाचे झाडाचा पाने देखील यात जळाली आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mantralaya Bribe Case: एक लाईन म्हणजे 50 हजार, दोन लाईन म्हणजे...; मंत्रालयातील लाचखोरीचं रेट कार्ड व्हायरल

Maharashtra Live News Update : . कल्याणमध्ये छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त अनोखी कलाकृती साकार

Dhule Crime : लग्नसोहळ्यात रक्तरंजित थरार! ८ जणांवर चाकूने सपासप वार, तिघांचा जागीच मृत्यू

Raja Shivaji: हातात भगवा, नजरेत ज्वाला…; शिवजयंतीनिमित्त रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' चित्रपटाची दमदार झलक समोर

Kolhapur News: छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर अश्लील डान्स|Video Viral

SCROLL FOR NEXT