मॅरेथॉन 
महाराष्ट्र

पहिला अंध सायकलिस्ट संकेत..ज्‍याने जिंकली हिमालयीन मॅरेथॉन

पहिला अंध सायकलिस्ट संकेत..ज्‍याने जिंकली हिमालयीन मॅरेथॉन

साम टिव्ही ब्युरो

सावदा (जळगाव) : प्रज्ञाचक्षू संकेत भिरूड याने हिमालयातील सर्वांत उंचावरील ६३० किलोमीटर अंतर सायकलने केवळ २६ तासांत पूर्ण करून ग्रेट स्पर्धा जिंकली. (jalgaon-news-faizpur-sanket-bhirud-first-blind-cyclist-hint-who-won-the-Himalayan-Marathon)

स्पर्धेतील इतर सर्व स्पर्धक सर्वसाधारण होते. सर्वसाधारणपणे दिव्यांग व्यक्तींना समाजात वेगळे पाडले जाते. त्यांच्या क्षमतांचा विचारही केला जात नाही. त्यातून अशा व्यक्ती मागे पडतात आणि आत्मविश्वास गमावतात, असे होऊ नये. दिव्यांगांना सर्वसामान्यांबरोबर सर्वच ठिकाणी सहभागी होता यावे, असा या स्पर्धेच्या आयोजकांचा हेतू असल्याचे बोहेमियन ॲडव्हेंचर संस्थेच्या संस्थापक अनुषा सुब्रमण्यम यांनी सांगितले.

३९२ मैलांचा प्रवास

संकेत फैजपूर येथील मूळ रहिवासी आणि सध्या बेंगळुरू येथे कार्यरत आहे. ६३० किलोमीटरची ‘दि ग्रेट नालयन अल्ट्रा मॅरेथॉन सायकलिंग स्पर्धा जिंकणारा तो पहिला अंध व्यक्ती आहे. संकेत आणि अरहम शेख यांनी जोडसायकलीवर (Tandem) ही स्पर्धा लेह ते लडाख आणि परत लेह असा ३९२ मैलांचा प्रवास २६ तास आणि एका मिनिटात पूर्ण केला. विश्रांतीची वेळ धरून २९ तास लागले. वैयक्तिक आणि सांघिक रिले या दोन पद्धतीत ही स्पर्धा पार पडली. त्यात सांघिक रिले स्पर्धेत संकेतसह १२ जणांचा संघ सहभागी होता. यातील चौघे स्पर्धक, तर इतर आठ त्यांच्या संघात सहाय्यक म्हणून होते.

आमच्या यशावरून इतर दिव्यांगांनाही प्रेरणा मिळावी आणि त्यांनीही अशा विविध साहसी खेळांसाठी पुढे यावे, अशी अपेक्षा आहे. त्यातूनच सर्वसामान्यांची दिव्यांगांबाबतची सर्वसमावेशकता वाढेल, असा मला विश्वास आहे.

- संकेत भिरुड, विजेता सायकलिस्ट

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Car Crash : महिला वकिलाचे कारवरील नियंत्रण सुटले, रिव्हर्स घेताना अपघात; घटनेचा Video Viral

काँग्रेसला भाजपचा मोठा झटका; माजी राज्यमंत्र्यांसह प्रमुख नेत्यांनी हाती घेतलं 'कमळ' | Politics

Maharashtra Live News Update: रस्त्याच्या वादातून तणाव! खेड तालुक्यात जैदवाडीत दगडफेक आणि वाहनांची तोडफोड

Shirvale Recipe : मॅगीसारखा दिसणारा कोकणातला हा पदार्थ कोणता? वाचा परफेक्ट शिरवाळ्याच्या पीठाची रेसिपी

Bhagavad Gita: भगवद्गीतेचा आठवा अध्याय कोणती शिकवण देतो?

SCROLL FOR NEXT