Jalgaon News Saam tv
महाराष्ट्र

Jalgaon News : कर्जबाजारीपणातून रिक्षा चालकांचे टोकाचे पाऊल 

Jalgaon News : कोरोना काळानंतर कर्जबाजारी झाल्यापासुन हा तरुण तणावात राहत असल्याचे त्याच्या परिचीतांनी सांगितले

Rajesh Sonwane

जळगाव : शहरातील शिवाजीनगर उस्मानिया पार्क भागात रिक्षा चालकाने गळफास घेत आत्महत्या केली. (jalgaon) सदर घटना शनिवारी रात्रीच्या सुमारास घडली. रोजगाराचा ताण आणि कर्जबाजारु पणामुळे या तरुणाने आत्महत्या केल्याची माहिती हाती आली आहे. (Breaking Marathi News)

बिलाल शेख वलीयोद्दीन (वय ३१) असे मयत तरुणाचे नाव आहे. जळगाव शहरातील शिवाजीनगर उस्मानिया पार्क भागातील नागोरी डेअरीच्या गल्लीत बिलाल शेख वलियोद्दीन हा पत्नी व चार वर्षाची मुलगीसह वास्तव्यास होता. कोरोना काळानंतर कर्जबाजारी झाल्यापासुन हा तरुण तणावात राहत असल्याचे त्याच्या परिचीतांनी माहिती देतांना सांगितले. दरम्यान शनिवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास त्याने राहत्या घरात आत्महत्या केल्याचे पत्नीला आढळून आले. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

पतीला पाहताच पत्नीने हंबरडा फोडला. शेजाऱ्यांनी मदतीला धाव घेत मृतदेह खाली उतरवुन शहर पेालिसांना घटनेची माहिती कळवली. (Police) पोलिसांसह परिसरातील रहिवाश्यांनी रुग्णवाहिकेसाठी प्रयत्न करुनही रुग्णवाहीका उपलब्ध नसल्याने अखेर रात्री रिक्षातून मृतदेह जिल्‍हा रुग्णालयात आणण्यात आला. शहर पेालिसांत या प्रकरणी अकस्मीक मृत्युची नोंद करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: अंबरनाथमध्ये शिवसेना-भाजप युती ठरली? राजकीय सस्पेन्स कायम

Alcohol Side Effects: मेंदुपासून थेट ह्रदयाला धोका, दारुमुळे शरीरावर होतात हे 7 गंभीर परिणाम

वादळाचा थरार! माणूस थेट हवेत उडाला, धक्कादायक व्हिडीओ व्हायरल

Friday Horoscope: या राशींचे प्रेमसंबंधात अडथळा येण्याची शक्यता; वाचा आजचं राशीभविष्य

NEETचा पेपर कसा फुटला? यश यादवकडे कुठून आला पेपर?

SCROLL FOR NEXT