Jalgaon Crime News Saam tv
महाराष्ट्र

Jalgaon: कंत्राटी महिला कर्मचारीकडून खंडणी घेत शरीरसुखाची मागणी

कंत्राटी महिला कर्मचारीकडून खंडणी घेत शरीरसुखाची मागणी

साम टिव्ही ब्युरो

जळगाव : जिल्हा परिषदेत कंत्राटी कामगार असलेल्‍या महिला कर्मचारीकडून ४५ हजारांची खंडणी उकळली. इतकेच नव्‍हे तर शरीरसुखाची देखील मागणी केली. यामुळे पीडितेने पोलिसांत धाव घेत तक्रार दिली. यानंतर बोगस लाचलुचपत विभाग अधिकारी आणि बोगस क्राईम रिपोर्टरचे बिंग फुटले असून ते तोतया असल्याचे उघड झाले. जिल्‍हापेठ पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. (Live Marathi News)

जळगावच्‍या जिल्हापेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीत वास्तव्यास असलेली चाळीस वर्षीय विवाहिता जिल्हा परिषदेच्या एका पंचायत समिती कार्यालयात कंत्राटी कामगार म्हणून कार्यरत आहे. या दरम्‍यान ७ ते १५ ऑक्टोबर दरम्यान महेंद्र सोनवणे (रा. खर्दे, ता. धरणगाव), कथित क्राईम इन्व्हेस्टीगेशन न्यूज रिपोर्टर राजेंद्र निकम (रा. वाघनगर जळगाव) यांच्यासह एक अनोळखी अशा तिघांनी महिलेला पंचायत समिती कार्यालयात येऊन आपण लाचलुचपत प्रतिबंध खात्याचे अधिकारी असल्याचा धाक दाखवत कट रचला.

व्हिडिओ बनवून व्‍हायरल करण्याची धमकी

महिलेच्या हातात १ हजार रुपयांची रक्कम ठेवून व्हिडिओ बनविला. हा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल करण्याची धमकी दिली अन्‌ तसे न करण्यासाठी या महिलेकडून ४५ हजाराची खंडणी वसूल केली. याशिवाय तिच्याशी अंगलट करून शरीरसुखाची मागणी करत विनयभंग केला. हा प्रकार घडल्यानंतर विवाहितेने जिल्हापेठ पोलिस ठाण्यात धाव घेऊन रीतसर तक्रार दिली. तक्रारीवरून जिल्हा पेठ पोलिस ठाण्यात शनिवारी (ता.१५) रात्री उशिरा महेंद्र सोनवणे व राजेंद्र निकम यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस उपनिरीक्षक प्रदीप चांदेलकर तपास करीत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Famous Actor : प्रसिद्ध अभिनेत्याला मुंबईतून अटक; महिलेसोबत नको ते कृत्य केलं, नंतर...

Mumbai News: मुंबई महानगर पालिकेत मोठा प्रशासकीय फेरबदल, ८०० अभियंत्यांची तडकाफडकी बदल्या

Maharashtra News Live Update: दुष्काळग्रस्त भागांसाठी राज्य सरकार पावले उचलेल : सुनील तटकरे

महिलांनो! वजन लय वाढलंय? Weight Loss करण्यासाठी 'या' सवयी लगेच सोडा

Health Tips: दुप्पट वेगाने कमी होईल वजन; आहारात फक्त या एका गोष्टीचा करा समावेश, ३२ वरून २८ होईल कंबर

SCROLL FOR NEXT