महाराष्ट्र

उत्तर महाराष्ट्रात हवाय कृत्रिम पावसाचा प्रयोग; मागणीची मुख्‍यमंत्री कार्यालयाकडून दखल

उत्तर महाराष्ट्रात हवाय कृत्रिम पावसाचा प्रयोग; मागणीची मुख्‍यमंत्री कार्यालयाकडून दखल

Rajesh Sonwane

जळगाव : उत्तर महाराष्ट्रात पावसाने दडी मारल्याने दुबार, तीबार पेरलेले पिके देखील करपू लागली असून हंगाम ७० टक्के हातचा गेला आहे. उर्वरित ३० टक्के तरी हातात यावा यासाठी उत्‍तर महाराष्‍ट्रात कृत्रिम पावसाचा प्रयोगाची मागणी शेतकरी कृती समितीतर्फे केली आहे. (jalgaon-news-Experiment-with-artificial-rain-in-North-Maharashtra)

जळगाव जिल्‍ह्यासह धुळे व नंदुरबार जिल्‍ह्यात यंदा पावसाने दडी मारली आहे. सरासरीपेक्षा पाऊस कमी झाल्‍याने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. दुबार पेरणीनंतर देखील उत्‍पन्‍न येते किंवा नाही हा प्रश्‍न आहे. केवळ ढगाळ वातावरण राहते; परंतु, पाऊस येत नसल्‍याने शेतकरी चिंतेत आहे.

ढगाळ वातावरणाचा होईल फायदा

जोपर्यंत ढगाळ वातावरण आहे व ते पाण्याचे ढग असून फक्त वातावरणात आर्द्रता तयार होत नसल्याने पावसात रूपांतर होऊ शकत नाही. त्यासाठी शासनाने कृत्रिम पाऊस पाडण्याचा प्रयोग करण्याची मागणी शेतकरी कृती समितीने मुख्यमंत्री उद्घव ठाकरे यांचेकडे ई मेलद्वारे केली होती. पालकमंत्री गुलाबराव पाटील, जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना प्रत्यक्ष भेटून समन्वयक एस. बी. पाटील व सहकाऱ्यांनी केली आहे.

कृत्रिम पावसाचा प्रयोग यशस्वी झाला तर..

जर हा कृत्रिम पावसाचा प्रयोग यशस्वी झाला तर त्याचा फायदा फक्त शेतकऱ्यांच्या शेतीसाठीच नाही. तर भविष्यातील पिण्याचे पाण्याचे प्रश्न सोडवण्यास देखील मदत होईल व जनतेचे हाल वाचतील. नंतर शासनाचे करोडो रुपये देखील वाचतील. पण जर उशीर केला व नंतर जर ढग आले नाहीत; तर हा प्रयोग करणेदेखील शक्य होणार नाही असे देखील मागणीत नमूद केले आहे.

मुख्‍यमंत्री कार्यालयाकडून दखल

कृत्रिम पावसाबाबत मुख्यमंत्री कार्यालयास शनिवारी (ता. ७) रात्री ९:०६ मिनिटांनी पाठवलेल्या पत्राची दखल तात्काळ घेवून रात्रीच १:०५ मिनिटांनी कृषी सचिव एकनाथ डवले यांच्‍याकडे कार्यवाहीसाठी पाठवले आहे. एवढी तात्काळ दखल घेतल्याने साऱ्यांनी मुख्यमंत्री कार्यालयाचे कौतुक केले आहे. आता प्रतीक्षा प्रत्यक्ष कार्यवाहीची.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT