NItin Raut
NItin Raut Saam tv
महाराष्ट्र

राज्‍यात यापुढेही भारनियमन नाही; ऊर्जामंत्री नितीन राऊत

संजय महाजन

जळगाव : गेल्या बावीस तेवीस दिवसांपासून राज्यात कुठेही भारनियमन नाही. राज्यात भारनियमनाच्या केवळ वावड्या उठवल्या जात आहेत. यापुढेही राज्‍यात भारनियमन होवू देणार नसल्‍याची प्रतिक्रिया ऊर्जामंत्री नितीन राऊत (Nitin Raut) यांनी भुसावळ येथे दिली. (jalgaon news Minister Nitin Raut statemennt no load shedding in the state anymore)

ऊर्जामंत्री नितीन राऊत हे आज जळगाव (Jalgaon) जिल्हा दौऱ्यावर आहेत. मंत्री राऊत यांच्‍या हस्‍ते चिचाटी (ता. रावेर) येथे ३३ केव्ही उपकेंद्राचे भूमिपूजन, तसेच मोर धरण येथे नियोजित सौर ऊर्जा प्रकल्प स्थळाची पाहणी, दीपनगर औष्णिक वीज निर्मिती केंद्राची पाहणीनिमित्‍ताने जळगाव दौऱ्यावर आहेत. यावेळी ते पत्रकारांशी संवाद साधताना बोलत होते.

रोहित्र बिघाड म्‍हणजे भारनियमन नाही

जळगाव जिल्ह्यातील भुसावळ (Bhusawal) येथे दीपनगर औष्णिक वीज निर्मिती केंद्राची पाहणी करुन आढावा घेतील. यावेळी राज्‍यातील भारनियमनावर (Load Shedding) बोलताना राऊत म्‍हणाले, की वादळ आले तर ट्रीपिंग होते. तसेच उष्णता वाढली तर ट्रान्‍सफार्मर जळू शकतो. याला भारनियमन म्हणता येणार नाही. सलग तीन– चार तास लाईट बंद राहिली तर भारनियमन असते. परंतु, राज्‍यात पुढेही भारनियमन होवू देणार नसल्‍याने यावेळी नितीन राऊत म्हणाले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Criminal Justice 4 Announcement : पंकज त्रिपाठी हाती आला नवा खटला; क्रिमिनल जस्टीसच्या चौथ्या भागात कोणाला देणार न्याय

Viral Video: भयानक! भररस्त्यात धावत्या दुचाकीने अचानक घेतला पेट; पुढे जे घडलं ते... थरारक VIDEO समोर

Avinash bhosale : उद्योजक अविनाश भोसले यांना मोठा दिलासा; मुंबई हायकोर्टाकडून जामीन

EPF Balance: एक मिस्ड कॉल द्या अन् ईपीएफ बॅलेंस चेक करा; वाचा सविस्तर

Latur Water Crisis | टँकर आला की हंडा घेऊन पळतात, लातूर जिल्ह्यात भीषण परिस्थिती!

SCROLL FOR NEXT