Farmer Saam tv
महाराष्ट्र

Jalgaon: कृषी वीजबिल थकबाकीतील अकराशे कोटी माफ

कृषी वीजबिल थकबाकीतील अकराशे कोटी माफ

Rajesh Sonwane

जळगाव : कृषिपंपाच्या वीजबिलांमधून थकबाकीमुक्त होण्यासाठी जिल्ह्यातील दोन लाखांवर शेतकऱ्यांच्या मूळ थकबाकीमधील व्याज व विलंब आकारातील सूट, वीजबिल दुरुस्ती समायोजन तसेच निर्लेखनाचे (Jalgaon News) एकूण एक हजार १५६ कोटी रुपये माफ करण्यात आले आहेत. थकबाकीमुक्त होण्यासाठी आता केवळ एक महिना उरला आहे. (jalgaon news Eleven hundred crore waiver of agricultural electricity bill arrears)

थकबाकीची ५० टक्के रक्कम व पूर्ण चालू वीजबिल येत्या ३१ मार्चपर्यंत भरल्यास उर्वरित संपूर्ण थकबाकीची रक्कमही माफ करण्यात येत असून, त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन मुख्य अभियंता कैलास हुमणे यांनी केले. कृषिपंपाच्या वीजबिलांमधून थकबाकीमुक्त होण्यासाठी जिल्ह्यातील दोन लाख आठ हजार ५०७ शेतकऱ्यांच्या (Farmer) मूळ थकबाकीमधील व्याज व विलंब आकारातील सूट, वीजबिल दुरुस्ती समायोजन तसेच महावितरणकडून (Mahavitaran) निर्लेखनाचे एकूण एक हजार १५६ कोटी रुपये माफ करण्यात आले आहेत.

२१९० कोटींची थकबाकी

सध्या शेतकऱ्यांकडे वीजबिलांपोटी २१९० कोटी रुपयांची सुधारित थकबाकी आहे. त्यापैकी ५० टक्के थकबाकी तसेच सर्व चालू वीजबिलांचा येत्या ३१ मार्चपर्यंत भरणा केल्यास उर्वरित ५० टक्के म्हणजे तब्बल १०९५ कोटी रुपयांची माफी शेतकऱ्यांना मिळणार आहे. ज्या शेतकऱ्यांची वीजबिलांबाबत तक्रार किंवा शंका असेल त्याचे तातडीने निराकरण करावे व या योजनेचा लाभ सर्व थकबाकीदार शेतकऱ्यांना करून देण्यासाठी तत्परतेने कार्यवाही करावी, असे निर्देश अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी सर्व क्षेत्रीय कार्यालयांना दिले.

एक लाख शेतकऱ्यांनी भरले १०४ कोटी

कृषिपंप वीजबिलांच्या थकबाकीमुक्ती योजनेला सध्या चांगला प्रतिसाद मिळत असून, जिल्ह्यात आजपर्यंत एक लाख १०७ शेतकऱ्यांनी चालू वीजबिल व थकबाकीची काही रक्कम असे १०४ कोटी ६२ लाख रुपये भरून सहभाग घेतला आहे. या शेतकऱ्यांनी चालू बिलांसह सुधारित थकबाकीच्या ५० टक्के रकमेमधील शिल्लक रक्कम येत्या ३१ मार्चपर्यंत भरल्यास त्यांचीही उर्वरित ५० टक्के थकबाकी संपूर्ण माफ होणार आहे. आतापर्यंत सुधारित थकबाकीची एकूण ५० टक्के रक्कम व चालू वीजबिल भरून जिल्ह्यातील नऊ हजार ४६७ शेतकऱ्यांनी वीजबिल संपूर्णपणे कोरे केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Election Result: बारामतीचा दादा 'अजितदादा'! लोकसभेला काका, विधानसभेला पुतण्या

Mahrashtra Election Result : हूश्श! अखेर रोहित पवार विजयी झाले

Maharashtra Election Results: अजित पवारांचे शिलेदार चमकले! पाहा दादांच्या राष्ट्रवादीच्या ४१ विजयी आमदारांची संपूर्ण यादी

PM Narendra Modi : 'एक है, तो सेफ है'; महाराष्ट्रातील विधानसभा निकालानंतर PM नरेंद्र मोदींनी पुन्हा दिला नारा

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: महायुतीच्या विजयाचं दिल्लीत सेलिब्रेशन

SCROLL FOR NEXT