Eknath Khadse Jalgaon News Saam tv
महाराष्ट्र

Jalgaon: पालकमंत्री पदावरून वाद नको, जिल्‍ह्याचा विकास करा; मंत्रीमंडळ विस्‍तारानंतर खडसेंची प्रतिक्रीया

पालकमंत्री पदावरून वाद नको, जिल्‍ह्याचा विकास करा; मंत्रीमंडळ विस्‍तारानंतर खडसेंची प्रतिक्रीया

साम टिव्ही ब्युरो

जळगाव : राज्‍याच्‍या मंत्रीमंडळाचा विस्‍तार झाला. यात जळगाव (Jalgaon) जिल्ह्याला दोन कॅबिनेट मंत्री मिळाले आहे. यामुळे जिल्‍ह्यासाठी आता डबल इंजिन मिळाल्याने विकास वेगाने व्हायला हवा. मात्र पालकमंत्री कोण? यावरून वाद व्हायला नको आणि विकास थांबायला नको. अशी प्रतिक्रीया राष्ट्रवादी नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी दिली. (Jalgaon News Eknath Khadse Reaction)

राज्‍य सरकारच्‍या मंत्रीमंडळाचा विस्‍तार होवून कॅबिनेट मंत्री पदाच्‍या शपथविधीचा कार्यक्रम पार पडला. या मंत्रीमंडळात जळगाव जिल्‍ह्यातील भाजपचे गिरीश महाजन (Girish Mahajan) व शिंदे गटातील गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी देखील कॅबिनेट मंत्री पदाची शपथ घेतली. यानंतर खडसे यांनी आपली प्रतिक्रीया दिली आहे. दोन्ही मंत्र्यांच्‍या चांगल्या कामासाठी आपले सहकार्य करण्याची भूमिका राहणार असल्याचे देखील खडसे यांनी म्हटले आहे. तसेच शिंदे गट हिंदुत्वाच्या मुद्यावर वेगळे झाले होते. मात्र बहुतांश शिंदे गटाच्या आमदारांना मंत्री मंडळात स्थान मिळाले नसल्याचे पाहायला मिळत आहे. शिंदे यांनी असे ठरवले दिसत आहे; की तुम्ही हिंदुत्वसाठी इकडे आला आहेत तर मंत्री पदाची अपेक्षा नसावी.

थांबलेली विकास कामे करावी

मंत्रीमंडळ विस्तार होणार होणार असे सांगितले जात असताना आज उशीरा का होईना मुहूर्त मिळाला आहे. या मंत्री मंडळात सहभागी झालेल्या मंत्रांचे आपण स्वागत करतो आणि त्यांनी तातडीने विकास कामे हाती घेऊन जनतेच्या समस्या सोडवाव्यात ही अपेक्षा असल्‍याचे खडसे यांनी म्‍हटले आहे.

आरोपांसोबत पुरावे असताना मंत्री कसे केले?

गंभीर आरोप असलेले नेते हे भाजप आणि सेनेच्या कालखंडात काही नवीन राहिला नाही. मागच्या काळात नुसता आरोप होताच मला राजीनामा द्यावा लागला होता. आता मात्र नुसते आरोप नव्हे; तर पुरावे समोर येत असताना त्यांना कारवाई न करता मंत्री केले जात आहे. एका अर्थाने ते इकडे आले आणि स्वच्छ झाले असा हा या सरकारचा पारदर्शी प्रकार असल्याची टीका खडसे यांनी केली आहे

नोटीस कोणत्या कारणाने माहित नाही

लवासा प्रकरणात पवार कुटुंबाला नोटीस मिळाल्याच्या पार्शवभूमीवर खडसे यांनी म्हटले आहे, की लवासा प्रकरणात मलाही काही शंका होत्या. मी त्या काळी या प्रकरणाचा पाठपुरावा केला होता. चौकशीची मागणीही केली होती. नंतर हे प्रकरण न्यायालयात गेले. त्यात चौकशा झाल्या, मात्र त्यात कोणतेही तथ्य आढळून आले नव्हते. त्यामुळे यामध्ये पवार कुटुंबीय यांचा कोणताही संबंध नाही आणि ते दोषी आहेत असे न्यायालयाचा माध्यमातून बघायला मिळाले होते. आता न्यायालयाने त्यांना नोटीस दिल्याचा सांगितले जात आहे. नोटीस कोणत्या कारणाने दिली हे मला सांगता येत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vande Bharat Train Accident : मुंबईहून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा अपघात कसा घडला? कारण आलं समोर

Gold and Silver Prices: चांदी चकाकली! चांदीच्या दरात ३,५०० रुपयांची वाढ, सोनंही महागलं

LPG Cylinder Booking Rules: १ मे पासून एलपीजी बुकिंगचे नियम बदलणार, सिलिंडर डिलीव्हरीतही बदल होणार?

पोपट आता पाळीव नाही तर ‘वन्यजीव, 10 वर्षांच्या लढाईनंतर शेतकऱ्याला न्याय

अपात्र लाडकींचा आकडा 26 लाख? बोगस लाभार्थ्यांकडून 165 कोटी वसूल करणार, 30 एप्रिलपर्यंत ई-केवायसीची मुदत

SCROLL FOR NEXT