Eknath Khadse Saam tv
महाराष्ट्र

Eknath Khadse News: मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखविण्यावर खडसे ठाम; राष्ट्रवादी करणार आंदोलन

मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखविण्यावर खडसे ठाम; राष्ट्रवादी करणार आंदोलन

साम टिव्ही ब्युरो

जळगाव : राज्यात कापूस व कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणी, त्यावर सरकारने कोणताही तोडगा काढलेला नाही. जिल्ह्यातील (Jalgaon) मंजूर प्रकल्प अन्यत्र पळविले जाणे, भीषण टंचाई, बिघडलेली कायदा-सुव्यवस्था या सर्व प्रश्‍नांवर कोणतेही ठोस आश्‍वासन न मिळाल्याने मुख्यमंत्र्यांना आज (२७ जून) काळे झेंडे दाखविण्यावर (Eknath Khadse) आमदार एकनाथ खडसे ठाम आहेत. (Latest Marathi News)

कापसाला भाव नसल्याने निम्म्याहून अधिक कापूस आजही शेतकऱ्यांच्या घरात आहे. कांदा उत्पादक मेटाकुटीस आला आहे. जिल्ह्यातील प्रकल्प अन्य जिल्ह्यांमध्ये पळवून लावले. कायदा-सुव्यवस्थेसह पाणीटंचाईवर शासन गंभीर नाही. या सर्व प्रश्‍नांबाबत मंगळवारी ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमासाठी येणाऱ्या मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखविण्याची भूमिका राष्ट्रवादीने घेतली होती. माजी मंत्री व आमदार एकनाथ खडसे यांनी दोन दिवसांपूर्वी पत्रकार परिषदेत हे जाहीर केले होते.

दरम्यान, मुख्यमंत्र्यांचे प्रतिनिधी म्हणून आमदार किशोर पाटील यांनी (NCP) या विषयावर खडसे व मुख्मंत्र्यांचे बोलणे करून देण्याचा सोमवारी (२६ जून) प्रयत्न केला. मुख्यमंत्र्यांचे अधिकारी जळगावात सायंकाळी येऊन श्री. खडसे यांच्याशी यासंदर्भात बोलणार होते. मात्र, या सर्व प्रयत्नांमधून कोणतेही ठोस आश्‍वासन न मिळाल्याने (Eknath Shinde) मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखविण्यावर आपण ठाम असल्याचे श्री. खडसे यांनी सांगितले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शेतकऱ्यांच्या सुख-समृद्धीसाठी मावळात महाचंडी आणि महापर्जन्य याग; 6000 भाविकांचा सहभाग

IAS Transfer: 4 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या, राज्याच्या प्रशासनात मोठा फेरबदल

‘मोदी का बाप भी जाएगा’,भरसभेत खरगेंच्या विधानाने राजकारण तापलं! मोदींचं समर्थन करणाऱ्या तरुणालाही मारहाण

देशाच्या नंदनवनात साकारतोय भव्य रेल्वे प्रकल्प! 12 स्थानकं, 28 बोगदे अन् 57 पुलांचं जाळं; 83 टक्के प्रवास बोगद्यातून

2-3 महिन्यांत राजकारणात मोठी उलथापालथ; राज्यातील नेत्यांचे राजकीय भूकंपाचे संकेत

SCROLL FOR NEXT