Jalgaon Erandol Fire News Saam TV
महाराष्ट्र

Jalgaon News : जळगावच्या एरंडोलमध्ये गॅस सिलिंडरचा भीषण स्फोट; आगीत ८ जण होरपळले

Satish Daud

संजय महाजन, साम टीव्ही

जळगाव जिल्ह्यातील एरंडोल तालुक्यात सोमवारी (ता. ६) रात्रीच्या सुमारास भयानक घटना घडली. कासोदा गावात घरगुती गॅस सिलिंडरचा भीषण स्फोट झाला. या स्फोटात ६ जण होरपळले असून दोघे किरकोळ जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी कासोदा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. काहींची प्रकृती चिंताजनक असल्याचं कळतंय. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन स्फोटाची माहिती घेतली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, एरंडोल तालुक्यातील कासोदा येथे अनिल पुना मराठे हे शेतकरी गढी भागात परिवारासह राहतात. रात्रीच्या सुमारास सुमारास त्यांनी गॅस सिलेंडरची हंडी संपल्याने नवीन हंडी आणली होती. ती त्यांनी बसवल्यानंतर त्यातून गॅस लिकेज होऊन आग लागली.

आग लागताच घाबरून अनिल मराठे आणि त्यांच्या कुटुंबियांनी घराबाहेर धाव घेतली. आजूबाजूच्या ग्रामस्थांना आगीची माहिती कळताच त्यांनी मराठे यांच्या घराच्या दिशेने धाव घेतली. त्यावेळी अचानक सिलिंडरचा भीषण स्फोट झाला. हा स्फोट इतका भीषण होता की, आसपासचा परिसर हातला आणि ग्रामस्थ जोरात फेकले गेले.

या स्फोटात आठ जण भाजले गेले. यापैकी दोघांना किरकोळ दुखापत झाली. तर ६ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. घटनेची माहिती कळताच गावातील इतर ग्रामस्थांनी जखमींना जळगाव येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले. या स्फोटानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.

माहिममधील रहिवासी इमारतीला भीषण आग

मुंबईतील माहीम परिसरात असलेल्या एका रहिवासी इमारतीला आज सोमवारी पहाटेच्या सुमारास भीषण आग लागली. आग लागल्याचं कळताच इमारतीतील रहिवाशांनी तातडीने बाहेर धाव घेतली. काहीजण या आगीत अडकून पडले होते. अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले. तसेच इमारतीत अडकून पडलेल्या रहिवाशांना सुखरुप बाहेर काढले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Live Updates : पुण्यात राज ठाकरे यांच्या उपस्थितीत बैठकीला सुरुवात

आयटम साँगमुळे लहान मुलं भरकटतायत; वेळीच मुलांच्या अशा कृत्याकडे लक्ष द्या...!

लेकीच्या जन्मानंतर ५०,००० मिळणार; १८ वर्षांपर्यंत प्रत्येक महिन्याला जमा होणार पैसे; Majhi Kanya Bhagyashree Yojana चा लाभ कसा घ्यायचा?

Harshvardhan Patil: इंदापूरमधून आमदारकीचं तिकिट कुणाला? शरद पवारांसमोरच हर्षवर्धन पाटील स्पष्टच बोलले, म्हणाले...

Rashami Desai: रश्मी देसाईचा नवरात्री स्पेशल लूक, सौंदर्य खूपच भारी

SCROLL FOR NEXT