Jalgaon Rain Saam tv
महाराष्ट्र

Jalgaon Rain: जिल्ह्यात दुष्काळ सदृश्य परिस्थिती; पावसाअभावी खरीप हंगाम वाया जाण्याची भीती

Jalgaon News : जिल्ह्यात दुष्काळ सदृश्य परिस्थिती; पावसाअभावी खरीप हंगाम वाया जाण्याची भीती

संजय महाजन

जळगाव : जळगाव जिल्ह्यासह राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाने पाठ फिरवली आहे. यामुळे दुष्काळाचे सावंत निर्माण झाले आहे. (Jalgaon) जळगाव जिल्ह्यात देखील हीच परिस्थिती असून महिनाभरापासून पावसाने (Rain) पाठ फिरवली असल्याने खरीप हंगाम वाया जाण्याची भीती शेतकरी वर्गातून व्यक्त केली जात आहे. (Latest Marathi News)

साधारण १५ ते ३० दिवसांपासून पावसाने पाठ फिरवली आहे. पाऊस नसल्याने जळगाव जिल्ह्यातील तापमान ३५ अंशाच्या जवळ गेले आहे. यामुळे जमिनीला भेगा पडू लागल्या असून पिकांना पाण्याची गरज निर्माण झाली आहे. पावसाने पाठ फिरवली असल्याने शेतातील पिकं करपू लागली आहेत. शिवाय धरण देखील भरली नसल्याने पिण्याचा पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. अनेक गावांमध्ये ट्रॅकरद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे. 

४० टक्केच पाऊस 

जिल्ह्यात आतापर्यंत वार्षिक सरासरीच्या फक्त ४० टक्के इतका पाऊस पडला आहे. ऑगस्ट महिना संपला, तरीपण दमदार पाऊस पडलेला नाही. दुष्काळ सदृश्य परिस्थितीमुळे शेतकऱ्यांचा (Farmer) धीर सुटू लागलाय. पुढच्या चार-पाच दिवसात पाऊस पडला नाही; तर खरीप हंगाम वाया जाण्याची भीती आहे. उधार उसनवार करून पैसे जमवले आणि पेरणी केली. पण निसर्गाने दगा दिल्याने आता उधारीचे पैसे द्यायचे कसे हा प्रश्न शेतकर्यांसमोर आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Friday Horoscope: आज कोणत्या राशीचं भाग्य चमकणार? जाणून घ्या तुमच्या आयुष्यात काय बदल घडणार

शेतकऱ्यांचा बाप काढला म्हणून कानाखाली जाळ काढला; 'स्वाभिमानी'च्या जिल्हाध्याक्षाने बँक मॅनेजरच्या कानाशिलात लगावली Video Viral

School Closed: यवतमाळ जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालयांना सुट्टी; काय आहे कारण?

70 नगरसेवकांचं गुवाहाटीत कुटुंबीयांसह प्रशिक्षण,उल्हासनगर महापालिकेची 65 लाखांची उधळपट्टी, जनतेच्या पैशांवर काय झाडी काय डोंगर?

6 कोटींचा रस्ता महिन्याभरातच उखडला, कंत्राटदार-अधिकाऱ्यांचा टक्केवारीचा झोल, मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेची पोलखोल

SCROLL FOR NEXT