Jalgaon News Saam tv
महाराष्ट्र

Jalgaon News : जळगावात ठाकरे गटाला मोठा धक्का; जिल्हाप्रमुख शिंदे गटाच्या वाटेवर

Jalgaon News : विधानसभा निवडणुकीत आपली ताकद वाढविण्याचा प्रयत्न प्रत्येक पक्षाचा आहे. तर काही नाराज असलेले पदाधिकारी व कार्यकर्ते आपल्या पक्षाला सोडचिठ्ठी देत दुसऱ्या पक्षात प्रवेश करत असतात

संजय महाजन

जळगाव : विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु असतानाच ठाकरेंच्या शिवसेनेला जळगावात मोठा धक्का बसला आहे. ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख असलेले विष्णू भंगाळे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला असून ते शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचे सांगितले जात आहे. 

विधानसभा निवडणुकीत आपली ताकद वाढविण्याचा प्रयत्न प्रत्येक पक्षाचा आहे. तर काही नाराज असलेले पदाधिकारी व (Shiv Sena) कार्यकर्ते आपल्या पक्षाला सोडचिठ्ठी देत दुसऱ्या पक्षात प्रवेश करत असतात. यातच विधानसभेसाठी होत असलेल्या मतदानाची प्रक्रिया एका दिवसावर असतानाच (Jalgaon News) जळगावत शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. ठाकरे सेनेचे जिल्हा प्रमुख विष्णू भंगाळे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला असून ते लवकरच शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. 

मविआला धक्का 
निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे गटाचे भंगाळे यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिल्याने जळगाव शहर मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्री महाजन यांना मोठा धक्का मानला जात आहे. तर भंगाळे हे शिंदे गटात प्रवेश करणार असल्याने जळगाव शहर व जळगाव ग्रामीण मतदारसंघातील महायुतीची ताकद वाढणार आहे. 

लवकरच प्रवेश 

दरम्यान जळगाव शहर मतदारसंघातील भाजप महायुतीचे उमेदवार सुरेश भोळे यांनी विष्णू भंगाळे यांची भेट घेतली आहे. तर भंगाळे हे लवकरच पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत शिंदे सेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती महायुतीचे जळगाव शहराचे उमेदवार सुरेश भोळे यांनी दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tiger Shroff Firing Case: टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणात मोठी अपडेट; हरियाणातून आणखी दोन आरोपी ताब्यात

मोठी बातमी! राज्यातील २५ सरकारी विद्यालयांची नावे बदलली; तुमच्या परिसरातील शाळेचे नाव काय झाले? पाहा यादी

Maharashtra News Live Update: देवी विसर्जनात ध्वनिप्रदूषणाचा मर्यादा ओलांडली, न्यायलयाच्या निर्णयाचंही उल्लंघन, आवाज फाउंडेशनचं मुख्यमंत्र्यांना पत्र

Thane Water Crisis : ठाण्यात जलसंकट! या महत्वाच्या भागांत तब्बल 36 तास पाणीपुरवठा बंद

Hair Care: केस ड्राय आणि फ्रिझी झालेत? मग घरच्या घरी तयार करा 'हा' खास हेअर मास्क

SCROLL FOR NEXT