Jalgaon Ram Mandir Inauguration Celebration: Distribution of 2100 kg ladu will be held in Jalgaon - Saam news Marathi Saam tv
महाराष्ट्र

Jalgaon Ram Mandir Celebration: जळगावात होणार २१०० किलोचे लाडू वाटप

Rajesh Sonwane

Jalgaon Ram Mandir Inauguration Celebration

जळगाव:

अयोध्येत प्रभू श्रीरामलल्लाची प्रतिष्ठापना होत आहे. यानिमित्ताने देशभरात आनंदोत्सव साजरा केला जात आहे. प्रभू श्रीरामाच्या आगमनाने घरात गोडधोड करून उत्सव साजरा केला जात आहे. तर विविध संस्थांकडून गोड पदार्थाच्या वाटपातून आनंदोत्सव साजरा होणार आहे. यात (Jalgaon) जळगाव शहरात २१०० किलोचे लाडू वाटप केले जाणार आहेत. (Maharashtra News)

जळगाव शहरातील जुने जळगाव बहुउद्देशीय मित्र मंडळ व जय हनुमान मित्र मंडळ बदाम गल्ली विठ्ठल पेठ यांच्या विद्यमाने राम कथा आयोजित केली आहे. या कथेचा समारोप आज (२२ जानेवारी) होत आहे. यानिमित्त परिसर सजविण्यात आला आहे. दरम्यान काल्याचे कीर्तन होऊन दुपारी शोभायात्रा (Ram Mandir) काढण्यात येणार आहे. तर सायंकाळी भरीत- पुरी, मोहनथाळ या महाप्रसादाचे देखील वाटप होणार आहे. भंडारा रामाप्रसादासाठी २५०१ किलो बुंदीचे प्रसाद वाटप करण्यात येणार आहे. तर २५ क्विंटल वांग्याचे भरीत देखील करण्यात येणार आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

बोदवडमध्ये बुंदी वाटप

बोदवड तालुक्यातील सिरसाळा येथे हनुमान मंदिरावर रामलल्ला प्राणप्रतिष्ठेनिमित्ताने सुंदरकांड महाप्रसादाचा कार्यक्रम तसेच शहरासह तालुक्यात भगवे ध्वज पताका, मंदिरावर रोषणाई करण्यात आली आहे. तर बोदवड शहरात बडगुजर समाज नवयुवक मंडळाकडून सहा क्विंटल बुंदी तयार करण्यात आली आहे. बुंदीचे ८ हजार पाकीट तयार केले असून हे प्रत्येक घरात प्रसाद वाटप करण्यात येणार आहे. 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Assembly Election: विधानसभेच्या मैदानात 'तुतारी'चाच आवाज! उमेदवारीसाठी तब्बल १६०० अर्ज; शरद पवारांकडून मुलाखतींचा धडाका

Baby Names Inspired by Flowers : सुगंधी आणि नाजूक फुलांवरून मुलींच्या नावाची यादी

Uddhav Thackeray: तुमच्या डोळ्यावरचं झापड पुसलं गेलं, शिंदे गटातून कार्यकर्ते परतले; ठाकरे काय म्हणाले?

Accident : कार- टेम्पोचा भीषण अपघात; चार जणांचा जागीच मृत्यू

Marathi News Live Updates : चेंबूरच्या आग दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना 5 लाखांची मदत - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

SCROLL FOR NEXT