Jalgaon News Saam tv
महाराष्ट्र

Jalgaon News : कर्जफेडीची चिंता; महिलेने संपविली जीवनयात्रा

Jalgaon News : जागृती अरुण कोळी (वय ३२) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. जागृती कोळी या पती अरुण कोळी व एक मुलगा यांच्यासह डीकसाई येथे वास्तव्यास होत्या.

साम टिव्ही ब्युरो

जळगाव : डोक्यावर असलेले कर्ज कसे फेडायचे याची चिंता सतावत होती. याच विंवचतेनून विवाहितेने विषप्राशन करून आत्महत्या केल्याची घटना जळगाव तालुक्यातील डिकसाई येथे घडली. या प्रकरणी (Jalgaon) जळगाव तालुका पोलीस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. (Maharashtra News)

डिकसाई (ता. जळगाव) येथील जागृती अरुण कोळी (वय ३२) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. जागृती कोळी या पती अरुण कोळी व एक मुलगा यांच्यासह डीकसाई येथे वास्तव्यास होत्या. शेती हाच त्यांचे उपजीविकेचे साधन होते. जागृती व अरुण कोळी हे स्वत:ची शेतीसोबतच गावातील इतरांची शेती उक्त्याने घेऊन करत होते. मात्र, यंदा (Rain) पाऊस कमी झाल्यामुळे शेतीतून उत्पन्न कमी आले. त्यात शेतीसाठी कर्ज घेतल्यामुळे आर्थिक अडचण होती. यामुळे कर्जफेडीची चिंता पती- पत्नी दोघांना लागून होती. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मुलगा घरात असतानाच केले विष प्राशन 

दरम्यान २५ जानेवारीला घरात मुलासोबत असताना जागृती कोळी यांनी विषप्राशन केले. यानंतर त्यांना त्रास होऊ लागला. आईला त्रास होत असल्याचे पाहून लहान मुलगा गल्लीत धावत गेला. शेजारच्यांना हा प्रकार लक्षात आल्यानंतर तातडीने जागृती कोळी यांना (Jalgaon Medical Collage) शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. आठवडाभर उपचार सुरु असताना १ फेब्रुवारीला त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. यावेळी कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Weather Update: अखेर मान्सून संपूर्ण महाराष्ट्रात सक्रिय; पुढील ५ दिवस या जिल्यात मुसळधार, IMD कडून अलर्ट

Maharashtra News Live Update: नसरापूर प्रकरणाचा आज न्यायालयात निकाल

Mumbai Local : लोकलमधील हत्येप्रकरणी आरोपीचा धक्कादायक खुलासा; 'त्या' रात्री नेमकं काय घडलं?

Thursday Horoscope : जोडीदारासोबत शांततेत दिवस जाणार, 5 राशींच्या व्यक्तींसाठी दिवस ठरणार गेमचेंजर; वाचा गुरूवारचे राशीभविष्य

मेडिकल स्टोरमधून औषधं घेताय? सावधान ! दैनंदिन वापरातील 157 औषधं धोकादायक?

SCROLL FOR NEXT