महाराष्ट्र

Jalgaon News : आईने मोबाईल हिसकावल्याच्या रागातून मुलीने उचलले टोकाचे पाऊल

Jalgaon News : दरवाजा ठोठावून देखील मुलगी प्रतिसाद देत नसल्याने त्यांनी दरवाजा तोडला. त्या वेळी मुलगी गळफास घेतलेल्या अवस्थेत बघताच तिच्या कुटुंबियांना धक्का बसला

साम टिव्ही ब्युरो

जळगाव : मोबाईल खेळत असल्याने मुलीच्या हातून आईने मोबाईल घेत तिला अभ्यास करण्याचे सांगितले. (Jalgaon) याचा राग मनात ठेवत १२ वर्षाच्या चिमुकलीने गळफास घेवून आत्महत्या केली. ही धक्कादायक घटना जळगावातील रामानंदनगरातील नंदनवन कॉलनीत घडली. याप्रकरणी रामानंद नगर (Police) पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. (Tajya Batmya)

जळगाव शहरातील आयोध्यानगर परिसरातील एका शाळेत शिक्षक असलेले भरत पाटील हे रामानंद नगरातील नंदनवन कॉलनीत वास्तव्यास आहे. त्यांची १२ वर्षाची मुलगी पद्मश्री उर्फ परी पाटील ही मोबाईल खेळत असल्याने तिच्या आईने तिला रागवून तिच्याजवळील (Mobile) मोबाईल हिसकावून घेतला व अभ्यास करण्यास सांगितले. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

वरच्या रूममध्ये जाऊन घेतला गळफास 
मोबाईल घेतल्याने परी हिला राग आला. रागाच्या भरात पद्मश्री ही घराच्या दुसऱ्या मजल्यावरील खोलीत गेली व झोक्याच्या कडीला ओढणीच्या सहाय्याने गळफास घेतला. बराच वेळ झाला तरी परी खाली न आल्याने कुटुंबीय खोलीकडे गेले. दरवाजा ठोठावून देखील मुलगी प्रतिसाद देत नसल्याने त्यांनी दरवाजा तोडला. त्या वेळी मुलगी गळफास घेतलेल्या अवस्थेत बघताच तिच्या कुटुंबियांना धक्का बसला. कुटुंबियांनी मुलीला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. याठिकाणी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिला मयत घोषीत केले. यावेळी पाटील कुटुंबियांनी एकच आक्रोश केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Nagar Parishad Live : येवलात मतदान केंद्राबाहेर राडा

Maharashtra Local Body Election 2025 : मतदानासाठी काही पण ! दीड लाख खर्च केले, तरुण थेट ऑस्ट्रेलियातून सांगलीत आला

Smriti Mandhana-Palash Muchhal: स्मृती मंधाना- पलाश मुच्छल लवकरच अडकणार विवाह बंधनात...? नेमकं खर कारण काय?

१९ मिनिटांचा MMS व्हिडिओ तुफान व्हायरल; इन्फ्ल्युएंसरच्या डुप्लिकेटचा आणखी ३ व्हिडिओ व्हायरल

Vitamin B12 च्या कमतरतेमुळे काय त्रास होतो? अमेरिकेतल्या डॉक्टरांनी सांगितली महत्वाची माहिती

SCROLL FOR NEXT