Mandakini Khadse Raksha Khadse
Mandakini Khadse Raksha Khadse Saam tv
महाराष्ट्र

Jalgaon Politics : खडसे कुटुंबात राजकारण पेटलं; सासूच्या विरोधात सूनेचा प्रचार..कोण मारणार बाजी?

साम टिव्ही ब्युरो

जळगाव : जळगाव जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. या निवडणुकीत खडसे विरूद्ध महाजन असेच पाहिले जात आहे. परंतु, मुक्‍ताईनगर (Muktainagar) मतदार संघात खडसे परिवारात अनोखे युद्ध पहावयास मिळत आहे. अर्थात सासू मंदाकिनी खडसे यांच्‍या विरूद्ध त्‍यांच्‍या सून खासदार रक्षा खडसे (Raksha Khadse) प्रचार करत आहेत. (Live Marathi News)

जळगाव (Jalgaon) जिल्हा दूध संघाच्या निवडणुक अंतिम टप्‍प्‍यात येवून पोहचली आहे. निवडणुकीसाठी १० डिसेंबर रोजी मतदान होत आहे. या निवडणुकीत महाविकास विकास आघाडी विरुद्ध (BJP) भाजप व शिंदे गट मैदानात आहेत. जिल्‍ह्यातील सध्‍याचे राजकारण हे (Eknath Khadse) एकनाथ खडसे व गिरीश महाजन यांच्‍या भोवती फिरत असल्‍याचे पहावयास मिळत आहे. यामुळे या निवडणुकीत दोघांचीही प्रतिष्ठा पणाला लागली आहे. यामुळे या निवडणुकीकडे राज्याचे लक्ष लागले आहेत.

खडसेंच्‍या बालेकिल्‍ल्‍यात प्रचार

निवडणुकीत मुक्ताईनगरातून महाविकास आघाडीच्या पॅनलकडून एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे या रिंगणात आहेत. तर त्यांच्या विरोधात भाजपच्या उमेदवार आमदार मंगेश चव्हाण उभे आहेत. आमदार चव्हाण यांच्या प्रचारार्थ रविवारी खडसेंच्‍या बालेकिल्‍ल्‍यात अर्थात मुक्ताईनगर येथे शिंदे– भाजप गटाच्या शेतकरी पॅनलचा मेळावा झाला. मुक्ताईनगरातून उमेदवार असलेल्या खडसेंच्या पत्नी मंदाकिनी खडसे यांच्या विरोधात प्रचारासाठी असलेल्या मेळाव्यात खडसेंच्या सूनबाई खासदार रक्षा खडसेंची उपस्थिती होती. सासू विरोधात सुनेच्या प्रचाराची लढाई राजकीय क्षेत्रात चर्चेचा विषय बनली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vitthala Tuch Trailer : माणसा माणसांत दडलेला विठ्ठल 'विठ्ठला तूच' मधून येणार भेटीला, ट्रेलरने वाढविली उत्सुकता

Radish Benefits: उन्हाळ्यात मुळा खाण्याचे फायदे काय? घ्या जाणून

Yamini Jadhav: दक्षिण मुंबईत शिंदे गटाचा उमेदवार ठरला! अरविंद सावंतांच्या विरोधात यामिनी जाधव यांना दिलं तिकीट

Pune News: सहलीला जाणं पडलं महागात, चोरट्यांनी ४४ लाखांवर मारला डल्ला

Sonu Sood Fan : सोनू सूदची एक झलक पाहण्यासाठी चाहत्याची १५०० किमीची दौड, गाठली मायानगरी

SCROLL FOR NEXT