केळीबागा
केळीबागा 
महाराष्ट्र

बोदवड तालुक्याला चक्रीवादळाचा तडाखा; केळीबागा उद्ध्वस्त

साम टिव्ही ब्युरो

बोदवड (जळगाव) : तालुक्यातील काही भागात बुधवारी (ता. ६) दुपारी आलेल्‍या चक्रीवादळात केळी बागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. तालुक्यातील करंजी, देवडी या भागात बहुतांश बागा जमीनदोस्त झाल्या आहेत. तर चोपडा तालुक्यालाही वादळीवाऱ्यासह गारपिटीचा फटका बसला असून, पिकांचे नुकसान झाले आहे. (jalgaon-news-Cyclone-hits-Bodwad-taluka-Banana-orchards-destroyed)

नुकसानग्रस्त भागाची जिल्हा परिषद सदस्या वर्षा पाटील व रामदास पाटील यांनी पाहणी केली. दरम्यान, शेतकऱ्यांनी त्यांची व्यथा मांडत शासनाच्या निधीचा लाभ मिळावा, अशी मागणी केली आहे. या प्रकरणी प्रशासनाकडे पाठपुरावा करून सर्वतोपरी मदत मिळवून देऊ, असे आश्‍वासन जिल्हा परिषद सदस्या वर्षा पाटील यांनी शेतकऱ्यांना दिले.

चोपड्यात हजारो हेक्टरवर नुकसान

चोपडा तालुक्यातील दक्षिण भागात तापी नदीकाठावर असलेल्या काही भागांत बुधवारी (ता. ६) दुपारी दोनच्या सुमारास चक्रीवादळ, गारपिटीसह मुसळधारेने हजारो हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. तालुक्यातील तापी नदीकाठावरील अनवर्दे, घाडवेल, विचखेडा, धुपे, दोंदवाडे या गावांत विजांचा कडकडाट, वादळी वाऱ्यासह अर्धा तास जोरदार पावसाने हजेरी लावली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Uddhav Thacekray Dombivli Speech: फडणीवस ते मोदी ठाकरेंनी सगळ्यांनाच धारेवर धरलं

Today's Marathi News Live : धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यात वादळी वाऱ्यासह अवकाळीचा तडाखा

Bhiwandi Politics News | "ते भाजपचीच बी टीम.." भिवंडीच्या राजकारणात एकच खळबळ

Maharashtra Politics 2024 : '२ वर्षांनंतर नरेंद्र मोदी ७५ वर्षांचे होतायेत...'; राजकीय निवृत्तीवरून डोबिंवलीतील सभेतून उद्धव ठाकरेंनी भाजपला घेरलं

Sanjay Kaka Patil News | "तो जन्मालाच आला नाही.." मीच जिंकेन संजय पाटलांचं निकालावरुन मोठ वक्तव्य

SCROLL FOR NEXT