Cyber Crime
Cyber Crime saam tv
महाराष्ट्र

Cyber Crime: क्विक सपोर्ट ॲप केले डाऊनलोड; ऑनलाईन प्रकारे दहा लाखाची फसवणूक

साम टिव्ही ब्युरो

जळगाव : बीएसएनएल कनेक्शन बंद होत असल्याने केवायसी करावी लागणार. त्यासाठी क्विक सपोर्ट ॲप डाऊनलोड करण्यास सांगून त्‍याद्वारे बँकेचा ॲक्‍सेस प्राप्‍त करत सेवानिवृत्त शिक्षकाच्या बँक खात्यातून ९ लाख ९० हजार रुपयात परस्पर वर्ग केल्याची घटना उघडकीला आली. याप्रकरणी सायबर पोलिसात गुन्हा (Cyber Crime) दाखल करण्यात आला आहे. (jalgaon news cyber crime Quick Support App Downloaded and online fraud)

जळगाव (Jalgaon) शहरातील बी. जे. नगरातील सेवानिवृत्त शिक्षक विनोद गेंदालाल कोचुरे (वय ६०) हे कुटुंबियांसह वास्तव्यास आहेत. १६ जानेवारीला दुपारी त्यांना दोन अज्ञात क्रमांकावरुन फोन आले. यावेळी विनोद कोचुरे यांना तुमचे बीएसएनएल (BSNL) कनेक्शन बंद होत आहे. ते कनेक्शन चालू ठेवण्यासाठी तुम्हाला केवायसी करावी लागेल; असे सांगत विश्‍वास संपादन केला. तसेच त्यासाठी दहा रुपयांचा रिचार्ज करणे गरजेचे असल्‍याचे देखील त्यांनी कोचुरे यांना सांगितले.

ॲप डाउनलोड होताच रक्‍कम वर्ग

फोन करणार्‍याने विनोद कोचुरे यांना त्यांच्या मोबाईलमधील प्ले स्टोअरवरुन बीएसएनएल केवायसी क्विक सपोर्ट नावाचे ॲप डाऊनलोड करण्यास सांगितले. त्यांनी हे ॲप डाऊनलोड करताच संबधिताचे त्यांच्या मोबाईलचा ऍक्सेस घेवून एसबीआयच्या बँक (State Bank Of India) खात्यातील ९ लाख ९० हजार रुपये परस्पर वर्ग करण्यात आले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर सायबर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक लिलाधर कानडे हे करीत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Amit Shah : अमित शाह यांच्या Deepfake व्हिडिओ प्रकरणी दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई; ट्विटर हॅण्डल चालवणाऱ्या एकाला अटक

Contractors Engineer: राज्यातील अभियंता कंत्राटदार ७ मे पासून करणार काम बंद

Today's Marathi News Live : ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी मुख्यमंत्र्यांनी कंबर कसली

Sanjay Nirupam Joins Shinde Group | संजय निरूपम यांचा शिंदे गटात प्रवेश

Pravin Darekar On Amol Kolhe | अमोल कोल्हेंबाबत मोठा गौप्यस्फोट!

SCROLL FOR NEXT