Online Fraud Saam tv
महाराष्ट्र

ऑनलाईन कर्जाच्या नावे फसवणुक

ऑनलाईन कर्जाच्या नावे फसवणुक

साम टिव्ही ब्युरो

जळगाव : मोबाईल ॲप्लीकेशनच्या माध्यमातून ऑनलाईन काढलेल्या कर्जावर व्याज देवूनही पुन्हा पैश्यांची मागणी करत तरूणाच्या नातेवाईकांना अश्लिल मॅसेज पाठविले. यानंतर ५३ हजार ५९३ रूपयांची फसवणूक केल्याची घडली. जळगाव (Jalgaon) सायबर पोलीस ठाण्यात अज्ञात मोबाइल धारकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (jalgaon news cyber crime Fraud in the name of online loans)

जामनेर (Jalmner) शहरातील २८ वर्षीय तरूण हा आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. त्याचे ऑनलाईन सेवा केंद्राचे दुकान असून त्यावर त्याचा उदरनिर्वाह सुरू आहे. देान महिन्यापुर्वी (२९ मार्च ते ८ जून २०२२) दरम्यान या तरूणाने कॅश (Online Fraud) ॲडव्हान्स नावाच्या मोबाईल ॲप्लीकेशनच्या माध्यमातून वेळोवेळी २ लाख २९ हजार ९४ हजाराचे ऑनलाईन कर्ज घेतले. तरूणाने घेतलेल्या कर्जावर सर्व्हीस चार्ज म्हणून ८८ हजार ८१० रूपये कापून घेतले व उर्वरित १ लाख ४० हजार २५४ रूपये खात्यात जमा झाले.

कुटुंबियांच्‍या बदनामीची धमकी

समोरील अज्ञात मोबाईल धारकांनी सात दिवसाच्या आत पैश्यांची मागणी केली. त्यानुसार तरूणाने १ लाख ४० हजार २५४ रूपये आणि (Cyber Crime) कर्जाच्या रकमेवरील व्याज ५३ हजार ५६४ रूपये असे एकुण १ लाख ९३ हजार ८१८ रूपये परत केले. दरम्यान अज्ञात व्यक्तींनी अजून पैशांची मागणी केली. पैसे दिले नाही तर तुझ्यासह तुझ्या कुटुंबियांची बदनामी करू अशी धमकी दिली. तसेच तरूणाच्या मोबाईलचा डाटा चोरून तरूणासह नातेवाईकांना अश्लिल मॅसेज पाठवून खंडणीची मागणी केली. या त्रासाला कंटाळून तरूणाने जळगाव सायबर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून शनिवार ११ जून रोजी दुपारी सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस निरीक्षक लिलाधर कानडे करीत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पालघरमध्ये शिंदे गटाला जबरदस्त झटका, बडे नेते भाजपच्या वाटेवर; प्रमुख पदाधिकारीही कमळ हाती घेणार

Maharashtra Live News Update : शिवसेना शिंदे गटाचे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम करणार भाजपमध्ये प्रवेश...

Pune-Solapur : पुणे - सोलापूर महामार्गावर विचित्र अपघात, कारने २ अलिशान गाड्यांना उडवले, दोघांचा जागीच मृत्यू

Acidity in women: ॲसिडीटी, अपचन समजून ५०% लोकं करतायत 'या' गंभीर समस्येकडे दुर्लक्ष; सर्वाधिक महिला आणि मधुमेहींचा समावेश

Jawhar Heavy Rain : अतिवृष्टीने रस्ता खचला; ५० फुटाच्या लांब भेगा, रहदारी पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT