वाहन अडवून शेतकऱ्याला लुटले 
महाराष्ट्र

वाहन अडवून शेतकऱ्याला लुटले; अज्ञात दरोडेखोरांचा हल्ला

वाहन अडवून शेतकऱ्याला लुटले; अज्ञात दरोडेखोरांचा हल्ला

साम टिव्ही ब्युरो

जळगाव : केळीचे पैसे घेवून घरी परतणाऱ्या भोकर- भादली येथील शेतकऱ्याला अज्ञात पाच हल्लेखोरांनी बेदम मारहाण केली. यानंतर ५० हजाराच्‍या रोकडसह सोन्याचे ब्रेसलेट आणि अंगठी जबरी हिसकावून पोबारा केल्याची धक्कादायक घटना घडली. जखमी शेतकऱ्यावर जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहे. (jalgaon-news-crime-news-vehicle-stopped-and-the-farmer-was-robbed-Attack-by-unknown-robbers)

भोकर– भादली (ता.जळगाव) (Jalgaon) येथील निवृत्ती गंगाराम साळुंखे (वय ३७) असे जखमी शेतकऱ्याचे (farmer) नाव आहे. निवृत्ती साळुंखे हे शेती करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. शेतातील केळी (Banana) तालुक्यातील किनोद येथील व्यापाऱ्याला विक्री केले होते. त्याचे पैसे घेण्यासाठी निवृत्ती साळुंखे हे दुचाकीने मंगळवारी (२८ डिसेंबर) सायंकाळी पाचला किनोद येथे गेले होते. व्यापाऱ्याकडून ५० हजार रूपयांची रोकड घेवून ते दुचाकीवरून भोकर भादली येथे परतत होते. त्याच्यासोबत गावातील विठू उर्फ प्रकाश हे देखील होते.

दुचाकी अडविली

भोकर ते किनोद रस्त्यावर अज्ञात पाच जणांनी निवृत्ती यांची दुचाकी अडविली. निवृत्ती यांच्याकडे पैश्यांची मागणी केली असता त्यांच्यात बाचाबाची झाली. यात हल्लेखोरातील एकाने हातातील काठी निवृत्ती यांच्या डोक्याला मारली. त्यात ते जखमी झाले. त्यांच्या खिशातील ५० हजाराची रोकड आणि गळ्यातील दोन तोळ्याची सोन्याची चैन आणि १० ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी असा मुद्देमाल जबरी हिसकावून पोबारा केला आहे. जखमी अवस्थेत निवृत्ती यांनी त्यांचे चुलत भाऊ विजय गोपाल पाटील यांना फोनकरून घटनेची माहिती दिली. विजय पाटील यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेवून जखमी निवृत्ती पाटील यांना तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : नाशिकमध्ये खरात पार्ट २; NGO संस्था चालकाकडून १२१ महिलांचं लैंगिक शोषण

Cheesy White Sauce Maggi: चमचमीत नाश्ता हवाय? बनवा चीज व्हाईट सॉस मॅगी, सोपी आहे रेसिपी

इराणमध्ये अमिरेकन लढाऊ विमान कोसळलं, पायलटला पकडण्यासाठी बक्षीस केलं जाहीर, VIDEO

Fact Check: केंद्र सरकारची वर्क फ्रॉम होम योजना? महिलांना 25 हजार मानधन मिळणार?

Ashok Kharat: मुलानेच उघड केलं खरातचं हवाला कांड? चौकशीदरम्यान SIT ला सांगितली धक्कादायक माहिती

SCROLL FOR NEXT