Shreya Maskar
उन्हाळ्यात बाहेरचे दही खाण्यापेक्षा घरीच सिंपल पद्धतीने दही बनवा. कडक उन्हात थंडगार दही खाणे शरीराला फायदेशीर ठरते.
बहुतेक जण रात्रभर दही मुरवतात. ७-८ तासांत दही तयार होते. ते घट्ट होण्यासाठी रेफ्रिजरेटरमध्ये ठेवले जाते. मात्र दह्याला तरीही पाणी सुटते आणि ते वितळू लागते. असे होऊन नये म्हणून सोपी ट्रिक वापरा.
दूध उकळून त्यात दह्याचे स्टार्टर घालणे. यामुळे दही चांगले घट्ट होते. या ट्रिकमुळे दह्यातून पाणी सुटणार नाही.
प्रथम दूध चांगले उकळा. नंतर, ते पूर्णपणे थंड होऊ द्या. एकदा ते कोमट झाले की, तुम्ही दही घट्ट करू शकता. हे करण्यासाठी, दूध ४ ते ५ वेळा फेटा आणि नंतर ते एका मातीच्या भांड्यात ओता.
आता यात एक चमचा दह्याचे स्टार्टर घेऊन ते दुधात बाजूने घाला. भांडे न ढवळता झाकून ठेवा आणि ५ ते ६ तास थांबा. अशाप्रकारे तुम्हाला घट्ट दही मिळेल.
सकाळी दही उघडल्यावर, दोन किंवा चार टिश्यू पेपर घेऊन ते दह्यावर ठेवा. जर दह्यामध्ये अतिरिक्त पाणी असेल, तर टिश्यू पेपर ते पूर्णपणे शोषून घेईल.
टिश्यू पेपर जागेवरच राहू द्या. आता, हे दही कमीतकमी एक तासासाठी रेफ्रिजरेटरमध्ये ठेवा. वेळ झाल्यावर, दह्यावरून टिश्यू पेपर काढा. दही कापून तपासा. ते घट्ट आणि कडक झालेले असेल.
जर तुमच्याकडे वेळ कमी असेल, तर एका बाउलमध्ये गरम पाणी भरा आणि त्यावर दह्याचे भांडे ठेवा. गरम पाण्याच्या उष्णतेमुळे दही लवकर घट्ट होण्यास मदत होते.