Weight Loss Recipe : स्वाद अन् स्वास्थ्य दोन्ही उत्तम, 'ही' चटपटीत भेळ वजन कमी करायला करेल मदत

Shreya Maskar

वजन कमी

आजकाल वाढलेले वजन ही मोठी समस्या बनली आहे. मात्र तुम्ही हेल्दी आणि प्रमाणात खाऊन वजन कमी करू शकता. वजन कमी करण्यासाठी ब्रेकफास्टला कडधान्याची भेळ खा.

Weight Loss | pinterest

कडधान्याचे फायदे १

कडधान्ये (उदा. मूग, मटकी, हरभरा) उच्च प्रथिने (Protein) आणि फायबरचा उत्तम स्रोत असल्याने वजन कमी करण्यासाठी अत्यंत फायदेशीर आहेत.

Sprouted | pinterest

कडधान्याचे फायदे २

मोड आलेल्या कडधान्यांमध्ये कमी कॅलरीज असतात, ज्यामुळे पोट भरलेले राहते, भूक कमी लागते आणि पचनक्रिया सुधारते.

Sprouted Legumes | pinterest

कडधान्याची भेळ

कडधान्याची भेळ बनवण्यासाठी मोड आलेले मूग, मक्याचे दाणे, काकडी, कांदा, टोमॅटो, गाजर, शेंगदाणे, दही, मीठ, चाट मसाला, लिंबाचा रस आणि तुमच्या आवडीचे कडधान्ये इत्यादी साहित्य लागते.

Sprout Bhel | pinterest

कडधान्य

कडधान्याची भेळ बनवण्यासाठी सर्वप्रथम कडधान्य पाण्यात भिजवून त्यांना मोड काढून घ्या. त्यानंतर कडधान्यात मीठ टाकून ते कुकरमध्ये उकडून घ्या.

Legumes | pinterest

मक्याचे दाणे

आता एका मोठ्या बाऊलमध्ये हिरवीगार बारीक चिरलेली काकडी, कांदा , टोमॅटो, गाजर मिक्स करा. तसेच यात उकडलेले मक्याचे दाणे, शेंगदाणे मिक्स करा.

Corn | pinterest

मोड आलेले मूग

त्यानंतर उकडलेले आलेले मूग आणि इतर कडधान्य मिक्स करा. यात वरून थोडासा लिंबू पिळा. जेणेकरून भेळ आणखी चटपटीत होईल.

Moong Beans | pinterest

मीठ

शेवटी भेळमध्ये मीठ, चाट मसाला, दही मिक्स करा. वरून हिरवीगार कोथिंबीर घाला आणि भेळचा आस्वाद घ्या. अशाप्रकारे कडधान्याची चटपटीत आणि डाएट भेळ तयार झाली.

Salt | pinterest

NEXT : कलिंगडापासून बनवा थंडगार आईस्क्रीम, कडाक्याच्या उन्हात मिळेल थंडावा

Watermelon Ice Cream Recipe | saam tv
येथे क्लिक करा...