Watermelon Ice Cream Recipe : कलिंगडापासून बनवा थंडगार आईस्क्रीम, कडाक्याच्या उन्हात मिळेल थंडावा

Shreya Maskar

कलिंगडाचे फायदे

कलिंगड हे उन्हाळ्यात शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी उत्तम आहे. हे शरीरातील पाण्याचे प्रमाण वाढवते. हे शरीर थंड ठेवण्यास मदत करते.त्वचेच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरते आणि पचनक्रिया सुधारते. यात कॅलरीज आणि चरबीचे प्रमाण कमी असते.

Benefits of Watermelon | pinterest

कलिंगडाचा आईस्क्रीम

कलिंगडाचा आईस्क्रीम बनवण्यासाठी फुल क्रीम दूध, बिया काढलेले कलिंगड, कंडेंस्ड मिल्क, व्हीप्ड क्रीम, व्हॅनिला इसेन्स, खाण्याचा लाल रंग , दुधात भिजवलेले काळे मनुके, चॉकलेट चिप्स इत्यादी साहित्य लागते.

Watermelon Ice Cream | pinterest

दूध

कलिंगडाचा आईस्क्रीम बनवण्यासाठी सर्वप्रथम दूध अर्धे होईपर्यंत उकळा. दूध सतत ढवळत रहा, जेणेकरून त्याच्या गुठळ्या होणार नाही.

Milk | pinterest

कंडेंस्ड मिल्क

दूध थंड झाल्यावर, त्यात कंडेंस्ड मिल्क, व्हॅनिला इसेन्स आणि खाण्याचा लाल रंग घालून चांगले फेटून घ्या. दुधात भिजवलेले मनुके घाला.

Condensed Milk | pinterest

कलिंगडाचा रस

आता मिक्सरमध्ये कलिंगडाचे तुकडे टाकून त्यात कलिंगडाचा रस किंवा पेस्ट बनवा. त्यानंतर तयार रस दुधाच्या मिश्रणात टाका.

Watermelon Juice | pinterest

डायफ्रूट्स

शेवटी तुम्ही यात आईस्क्रीमची चव वाढवण्यासाठी डायफ्रूट्सचे काप देखील टाकू शकता. तुम्ही यात काजू, पिस्ता टाका.

Dry Fruits | pinterest

आईस्क्रीम सेट करा

सर्व साहित्य पुन्हा फेटून रेफ्रिजरेटरमध्ये सेट करायला ठेवून द्या. जेव्हा आईस्क्रीम थोडे घट्ट होईल, तेव्हा कलिंगडाचे लहान तुकडे करून आईस्क्रीमवर टाका.

Setting the Ice Cream | pinterest

चॉकलेट चिप्स

आता तयार आईस्क्रीम एका बाऊलमध्ये काढा आणि त्यावर मनुके, चॉकलेट चिप्स टाका. पुन्हा ५-१० मिनिटांसाठी फ्रिजमध्ये ठेवा आणि थंडगार कलिंगडाच्या आईस्क्रीमचा आस्वाद घ्या.

Chocolate Chips | pinterest

NEXT : भात खाऊनही वजन होईल कमी, वाचा 'ही' पुलावची हेल्दी रेसिपी

Weight Loss Recipe | SAAM TV
येथे क्लिक करा...