Weight Loss Recipe : भात खाऊनही वजन होईल कमी, वाचा 'ही' पुलावची हेल्दी रेसिपी

Shreya Maskar

तांदळाची निवड

डाएट पुलाव बनवण्यासाठी ब्राउन राइसचा वापर करा. रात्रीच्या जेवणाला झटपट ब्राउन राइसचा हेल्दी पुलाव बनवा. रेसिपी आताच नोट करा.

Choosing the Rice | pinterest

ब्राउन राइस पुलाव

ब्राउन राइस पुलाव बनवण्यासाठी सर्वप्रथम ब्राउन राइस स्वच्छ धुवून घ्या. त्यानंतर थोड्या पाण्यात काही वेळ भिजवत ठेवा.

Brown Rice Pulao | pinterest

डाएट पुलाव

त्यानंतर एका पॅनमध्ये तेल गरम करून त्यात जिरे, दालचिनी, काळी मिरी, वेलची, लवंग आणि मोहरी परतून घ्या.

Diet Pulao | pinterest

कांदा

त्यानंतर यात चिरलेला कांदा, आले, लसूण आणि हिरव्या मिरच्या घालून चांगले मिक्स करा. तुम्ही यात शेंगदाणे देखील टाकू शकता.

Chopped Onion | pinterest

गाजर

आता पुलावात बारीक चिरलेला घेवडा, गाजर आणि तुमच्या आवडीच्या भाज्या घाला. तुम्ही यात सीझन नुसार उकडलेले मक्याचे दाणे आणि हिरवे वाटाणे देखील घालू शकता.

Carrots | pinterest

कडधान्य

शेवटी मोड आलेले आणि अर्धे कच्चे मसूर पुलावात मिक्स करा. त्यानंतर यावर मीठ, हळद आणि लाल तिखट घालून सर्व मिश्रण चांगले एकत्र करा.

Masoor | pinterest

मेथीची पाने

शेवटी शिजवलेल्या भातात मेथीची पाने घालून चांगले मिक्स करा. अशाप्रकारे हेल्दी ब्राउन राइस पुलाव तयार झाला आहे.

Fenugreek Leaves | pinterest

फायदे

ब्राऊन राइस हा पांढऱ्या तांदळाच्या तुलनेत अधिक पौष्टिक मानला जातो, कारण यावर प्रक्रिया (पॉलिश) कमी केलेली असते. यात फायबर, जीवनसत्त्वे आणि खनिजे भरपूर प्रमाणात असतात.

Weight Loss | pinterest

NEXT : स्वयंपाकघरातील 'या' ५ मसाल्यांची जादू; पोटाची चरबी होईल झटपट कमी, सर्वजण विचारतील वेटलॉसचे सीक्रेट

Weight Loss | saam tv
येथे क्लिक करा...