Shreya Maskar
बडीशेप गॅस, पोट फुगणे आणि भूक कमी करण्यास मदत करते. त्यातील ॲनेथोलसारखी समृद्ध तेलं पचनक्रिया सुधारतात आणि दाह कमी करतात.
बडीशेपचा चहा प्यायल्याने पोट जास्त वेळ भरलेले राहते, ज्यामुळे वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत मिळते. तसेच पोटाची चरबी कमी होते.
दालचिनी थेट वजन कमी करत नसली तरी, ती रक्तातील साखर नियंत्रित करण्यास मदत करते. ती शरीरात इन्सुलिनप्रमाणे कार्य करते. साखरेची पातळी स्थिर ठेवते आणि वारंवार लागणारी भूक टाळते. जेणेकरून अतिरिक्त खाल्ले जात नाही आणि वजन वाढत नाही.
कमी दालचिनी रक्तातील साखर आणि कोलेस्ट्रॉल दोन्ही कमी करते, ज्यामुळे वजन कमी होण्यासही मदत मिळते.
जिरे पचनक्रिया सुधारण्यास आणि रक्तातील साखर नियंत्रित करण्यास मदत करते. दररोज दह्यामध्ये जिरे मिसळून खा. याने वजन आणि शरीरातील चरबी दोन्ही अधिक वेगाने कमी झाले.
काळी मिरी मधील पाइपरिन नावाचे संयुग केवळ चवच वाढवत नाही, तर नवीन चरबी पेशी तयार होण्यास प्रतिबंध करते, ज्यामुळे वजन वाढ कमी होते.
हळदीतील कर्क्यूमिन थेट चरबी कमी करत नसले तरी, ते दाह कमी करून चयापचय क्रिया सुधारते. शरीरातील उच्च दाह हा लठ्ठपणाशी संबंधित असल्याने, हळद तो कमी करण्यास मदत करते, ज्यामुळे वजन नियंत्रणात राहण्यास हातभार लागतो.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.