Shreya Maskar
वजन कमी करण्यासाठी पनीर खूप फायदेशीर आहे. पनीरमध्ये उच्च प्रथिने, हेल्दी फॅट्स आणि कमी कर्बोदके असतात, जे भूक नियंत्रित करून आणि स्नायू वाढवून वजन कमी करण्यास मदत करतात. डाएटमध्ये हेल्दी डाएट पनीर टिक्काचा समावेश करा.
डाएट पनीर टिक्का बनवण्यासाठी पनीर, दही, चणा डाळ पीठ, आले-लसूण पेस्ट, हळद, लाल मिरची पूड, धणे पूड, चाट मसाला, कसुरी मेथी, लिंबू, मीठ आणि मोहरीचे तेल इत्यादी साहित्य लागते.
डाएट पनीर टिक्का बनवण्यासाठी सर्वप्रथम पनीरचे चौकोनी तुकडे करा. बाजारातील फ्रेश पनीरचा वापर करा, जेणेकरून आरोग्याला कोणती हानी होणार नाही.
एका बाऊलमध्ये दही, चणा डाळ पीठ, आले-लसूण पेस्ट, हळद, लाल मिरची पूड, धणे पूड, चाट मसाला, कसुरी मेथी, लिंबाचा रस, मोहरीचे तेल आणि मीठ एकत्र करून त्या पेस्टमध्ये पनीरचे तुकडे घोळवून घ्या आणि एक तास मुरू द्या.
पॅनमध्ये थोडे तूप गरम करा. त्यात मॅरीनेट केलेले पनीर मध्यम आचेवर टोस्ट करा. दोन्ही बाजूंनी पनीर गोल्डन फ्राय करा. अशाप्रकारे डाएट पनीर टिक्का तयार झाला.
एका ताटात डाएट पनीर टिक्का काढा त्यावर हिरवीगार कोथिंबीर आणि बारीक चिरलेला कांदा घालून सजवा. पुदिन्याच्या चटणीसोबत गरमागरम सर्व्ह करा.
आठवड्यातून ३-४ वेळा तरी डाएट पनीर टिक्काचा आपल्या आहारात समावेश करा. ज्यामुळे तुमचे वजन झटपट कमी होईल.
पनीर पचनक्रिया सुरळीत करण्यास मदत करतात. कमी कर्बोदके आणि उच्च प्रथिनांमुळे, रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी आणि ग्लुकोजची अचानक वाढ रोखण्यासाठी पनीर फायदेशीर आहे.