Weight Loss Recipe : डाएटला करा टाटा, बाय बाय; चटपटीत चाट खाऊन वजन होईल कमी, वाचा रेसिपी

Shreya Maskar

वजन कमी

मखाण्यामध्ये कॅलरीजचे प्रमाण कमी, तसेच तंतुमय पदार्थ (फायबर) आणि प्रथिनांचे प्रमाण अधिक असल्यामुळे, ते वजन कमी करण्यास मदत करतात; कारण यामुळे पोट भरल्याची जाणीव होते आणि अतिखाणे टाळले जाते.

Weight Loss | pinterest

मखाना चाट

मखाना चाट बनवण्यासाठी मखाना, शेंगदाणे, कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, हिरवी चटणी, चिंच-खजुराची चटणी, मीठ, काळे मीठ, तिखट, जिरे पूड, चाट मसाला आणि लिंबाचा रस इत्यादी साहित्य लागते.

Makhana Chaat | pinterest

मखाना

मखाना चाट बनवण्यासाठी सर्वप्रथम मखाना तुपात गोल्डन फ्राय करून घ्या. गॅस मंद आचेवर ठेवा जेणेकरून मखाना जळणार नाही.

Makhana | pinterest

कांदा-टोमॅटो

त्यानंतर कांदा, टोमॅटो बारीक चिरून घ्या. तसेच हिरवीगार कोथिंबीर देखील चिरून घ्या. ज्यामुळे चव मखाना चाटची चव आणखी वाढेल.

Onion & Tomato | pinterest

शेंगदाणे

आता तुपात थोडे शेंगदाणे भाजून घ्या. तुम्हाला हवे असेल तर यात ड्रायफ्रूट्स देखील टाकू शकता. उदा. काजू, बदाम, पिस्ता, अक्रोड

Peanuts | pinterest

कोथिंबीर

एक मोठ बाऊल घ्या. त्यात भाजलेले शेंगदाणे, मखाना मिक्स करा. त्यानंतर यात चिरलेले कांदा, टोमॅटो, कोथिंबीर देखील टाका.

Coriander | pinterest

चिंच-खजुराची चटणी

चाटमध्ये हिरवी आणि लाल चटणी, चिंच-खजुराची चटणी घालून चांगले मिक्स करा. यात वरून मीठ, काळे मीठ, जिरे पूड, चाट मसाला टाका.

Tamarind-Date Chutney | pinterest

लिंबू

शेवटी मखाना चाटवर लिंबाचा रस पिळा. अशाप्रकारे चटपटीत पण हेल्दी मखाना चाट तयार झाला.

Lemon | pinterest

NEXT : फक्त ५ मिनिटांत बनवा 'हे' हेल्दी पुडिंग, वजन कमी करण्यासाठी ठरेल फायदेशीर

Weight Loss Recipe | saam tv
येथे क्लिक करा...