Weight Loss Recipe : फक्त ५ मिनिटांत बनवा 'हे' हेल्दी पुडिंग, वजन कमी करण्यासाठी ठरेल फायदेशीर

Shreya Maskar

हेल्दी पुडिंग

चिया सीड्समध्ये फायबरचे प्रमाण भरपूर असते. यामुळे पोट दीर्घकाळ भरल्यासारखे वाटते. भूक कमी लागते, ज्यामुळे वजन नियंत्रणात राहते.

Healthy Pudding | pinterest

आंबा

उन्हाळ्यात आंबा आवर्जून खाल्ला जातो. आंबाप्रेमींनो तुम्हाला आंबा खाऊन वजन कमी करायचे असले तर मँगो चिया पुडिंग बनवा. मात्र यात आंब्याचे प्रमाण कमी असावे.

Mango | pinterest

मँगो चिया पुडिंग

मँगो चिया पुडिंग बनवण्यासाठी नारळाचे दूध, आंब्याचे तुकडे, चिया सीड्स, भिजवलेले बदाम इत्यादी साहित्य लागते. तुम्ही यात इतर आवडीचे ड्रायफ्रूट्स देखील टाकू शकता.

Mango Chia Pudding | pinterest

नारळाचे दूध

मँगो चिया पुडिंग बनवण्यासाठी सर्वप्रथम एका बरणीत नारळाचे दूध आणि चिया सीड्स व्यवस्थित मिसळा. हे मिश्रण पाच मिनिटे चांगले मुरू द्या.

Coconut Milk | pinterest

थंड करा

बरणी झाकून ठेवा आणि किमान ३०-४० मिनिटांसाठी फ्रिजमध्ये ठेवा. तुम्ही ते रात्रभर फ्रिजमध्येही ठेवू शकता. यामुळे पुडिंग चांगले थंड होते आणि चव खूप भारी लागते.

Chill | pinterest

आंबा

आता आंब्याची साल काढून त्याचे छोटे छोटे तुकडे करा. त्यानंतर काही आंब्याच्या तुकड्यांची प्युरी करा आणि ती चिया सीड्सच्या मिश्रणात मिक्स करा.

Mango | pinterest

बदाम

आता यात भाजलेले बदामाचे काप टाका आणि तुम्हाला इतर आवडणारे ड्रायफ्रूट्स टाका. पुडिंग चांगले मिक्स करा.

Almonds | pinterest

चिया सीड्स

मँगो चिया पुडिंग सर्व्ह करताना एका बाउलमध्ये मँगो चिया पुडिंग ओता. त्यावर वरून पुन्हा चिया सीड्स आणि आंब्याचे छोटे काप टाका. थंडगार मँगो चिया पुडिंगचा आस्वाद घ्या. तुम्ही वरून ड्रायफ्रूटसचे काप टाका.

Chia Seeds | pinterest

NEXT : सकाळच्या नाश्त्याला बनवा डाएट इडली; फक्त टाका 'हा' एक पदार्थ, वजन वेगाने होईल कमी

Weight Loss Recipe | saam tv
येथे क्लिक करा...