Shreya Maskar
तुम्हाला हेल्दी आणि चटपटीत खाऊन वजन कमी करायचे असेल तर सकाळच्या नाश्त्याला ओट्स इडली बनवा. झटपट होणारी रेसिपी आताच लिहून घ्या.
ओट्स इडली बनवण्यासाठी सर्प्रथम ओट्स एका पॅनवर हलके गोल्डन फ्राय करून घ्या. त्यानंतर मिक्सरमध्ये बारीक पूड करून घ्या.
आताएका पॅनमध्ये तेल, मोहरी, उडीद डाळ आणि चणा डाळ घालून चांगली भाजा. त्यात चिरलेल्या हिरव्या मिरच्या, कोथिंबीर आणि किसलेले गाजर घाला.
मिश्रणात हळद घालून एक मिनिट परतून घ्या. त्यानंतर वाटलेली ओट्सची पावडर आणि दही घालून सर्व मिश्रण एकजीव करा. पीठ जास्त घट्ट किंवा पातळ होणार नाही याची काळजी घ्या.
इडली शिजवण्यासाठी इडली स्टीमरला तेल लावा आणि त्यात मिश्रण भरा. सुमारे १५-२० मिनिटे इडली वाफवून घ्या. अशाप्रकारे डाएट ओट्स इडली तयार झाली.
इडलीच्या पिठासारखा घट्टपणा येण्यासाठी तुम्ही मिश्रणात दह्याचे प्रमाण वाढवू शकता. कमी तिखट असलेल्या पुदिना-कोथिंबीर चटणीसोबत ओट्स इडलीचा आस्वाद घ्या.
ओट्समध्ये उच्च फायबर आणि कॉम्प्लेक्स कार्ब्स असतात, जे बराच वेळ पोट भरलेले ठेवतात, भूक कमी करतात आणि पचनक्रिया सुधारतात. यामुळे कॅलरीचे सेवन कमी होऊन वजन कमी होण्यास मदत होते.
उडीद डाळ प्रथिनांनी आणि फायबरने समृद्ध असते. त्यातील पोषक घटक भूक नियंत्रित करण्यास आणि चयापचय वाढवण्यास मदत करतात.