Weight Loss Recipe : अजिबात वजन वाढणार नाही, 'अशा' पद्धतीने बनवा तुमचा आवडता मँगो शेक

Shreya Maskar

वजन कमी

आंबा योग्य प्रमाणात खाल्ल्यास वजन कमी करण्यास मदत करू शकतो, कारण त्यात भरपूर फायबर असते, जे पोट भरलेले ठेवते आणि वारंवार भूक लागत नाही. तसेच, यात नैसर्गिक गोडवा असूनही कमी कॅलरीज असतात.

Weight Loss | pinterest

मँगो शेक

डाएट मँगो शेक बनवण्यासाठी सर्वप्रथम पूर्ण पिकलेल्या गोड आंब्याची निवड करा. आंबे कोमट पाण्यात स्वच्छ धुवून घ्या. आंबे कोरडे करा.

Mango Shake | pinterest

आंब्याचे तुकडे करा

आता आंब्याचे साल काढून त्यांचे तुकडे करा. तुकडे डाएरेक्ट ब्लेंडरमध्ये टाकून एक प्युरी बनवा. लक्षात ठेवा आंब्याचा रस काढताना त्यात इतर कोणतेही पदार्थ टाकू नका.

Mangoes | pinterest

फॅट-फ्री दूध

आता तयार प्युरी एका मोठ्या भांड्यात काढा त्यात नेहमीच्या दुधाऐवजी फॅट-फ्री दूध घाला. तुम्ही कोणत्याही ब्रँडचे स्किम्ड मिल्क किंवा कमी फॅटचे दूध वापरू शकता.

Fat-Free Milk | pinterest

फॅट-फ्री दूध नसेल तर...

तुम्हाला फॅट-फ्री दूध घ्यायचे नसेल तर नेहमीच्या दुधातील साय काढा, त्यासाठी दुधात थोडे पाणी घालून ते पातळ करा. अशा कमी फॅटच्या दुधाने शेक बनवल्याने लठ्ठपणा येत नाही.

Don't Have Fat-Free Milk... | pinterest

साखरेला टाळा

मँगो शेकचा खरा आनंद घ्यायचा असेल तर त्यात साखर घालणे टाळा. पूर्ण पिकलेल्या आंब्यांचे शेक आधीच गोड असते, त्यात अधिक साखर टाकल्यास त्याची चव बिघडत. तसेच नैसर्गिक गोडवा जातो.

Sugar | pinterest

गोडाला दुसरा पर्याय

तुम्हाला मँगो शेकमध्ये आणखी थोडे गोड हवे असेल तर साखरेऐवजी मध टाकू शकता. यामुळे फॅट वाढणार नाही, पण रेसिपीतील गोडवा नक्कीच वाढेल. दुसरा पर्याय म्हणजे गुळाचा वापर करा.

Sweetness | pinterest

ड्रायफ्रूट्स

मँगो शेक अधिक टेस्टी आणि हेल्दी बनवण्यासाठी त्यात काजू आणि मनुका घाला. ड्रायफ्रूट्सचे काप मँगो शेकची चव आणखी वाढवतील.

Dry Fruits | pinterest

NEXT : वजन कमी करायचंय; 'हा' पदार्थ आतापासून खायला सुरूवात करा, उन्हाळ्यात शरीराला मिळेल थंडावा

Weight Loss Recipe | saam tv
येथे क्लिक करा...