Shreya Maskar
वजन कमी करण्यासाठी आहारात हेल्दी पदार्थांचा समावेश करा. पनीर वजन कमी करण्यासाठी खूप फायदेशीर आहे. यात प्रथिने, फॅट्स जास्त असल्याने पोट दीर्घकाळ भरलेले राहते आणि वारंवार भूक लागत नाही, ज्यामुळे कॅलरीचे प्रमाण नियंत्रित राहते.
पनीर सलाड बनवण्यासाठी पनीर, काकडी, काळी मिरी, मीठ, चाट मसाला, लिंबाचा रस, कांद्याची पात , टोमॅटो इत्यादी साहित्य लागते. पनीर चांगला फ्रेश घ्यावा.
पनीर सलाड बनवण्यासाठी सर्वप्रथम काकडी, कांद्याची पात आणि टोमॅटो बारीक चिरून घ्यावे. तुम्ही यात तुमच्या आवडीच्या भाज्या देखील टाकू शकता.
त्यानंतर एक थेंब तुपात पनीरचे तुकडे टाकून रोस्ट करून घ्या. यासाठी पनीरचे छोटे छोटे तुकडे करा आणि पाण्यात १ मिनिट ठेवून द्या.
आता बाऊलमध्ये तळलेले पनीरचे तुकडे आणि मीठ , काळी मिरी टाकून मिक्स करा. मसाला पनीरला लागेल याची काळजी घ्या.
त्यानंतर मिश्रणात चाट मसाला घालून पुन्हा मिक्स करा. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही यात थोडे चीज देखील किसून टाकू शकता.
शेवटी पनीर सलाडमध्ये बारीक चिरलेली पुदिना, कोथिंबीर टाका. त्यावर लिंबाचा रस पिळा. जेवताना हे सलाड खाल्ल्यामुळे वजन कमी होण्यास मदत मिळेल.
काकडी वजन कमी करण्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. त्यात कॅलरीज खूप कमी आणि पाणी, फायबरचे प्रमाण भरपूर असते. यामुळे पोट लवकर भरते, भूक कमी लागते आणि शरीराला हायड्रेटेड ठेवून वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते.