Murder case 
महाराष्ट्र

दोन्‍ही मुलांनी मिळून केला जन्‍मदात्‍याचा खून; दवाखान्‍यात जाण्याचे किरकोळ कारण

दोन्‍ही मुलांनी मिळून जन्‍मदात्‍याचा खून; दवाखान्‍यात जाण्याचे किरकोळ कारण

Rajesh Sonwane

जळगाव : आजारी वडीलांना दवाखान्यात जाण्याचे सांगितले. या किरकोळ कारणावरून उद्‌भवलेल्‍या वादातून पोटच्‍या दोन्ही मुलांनी वडीलांचा खून केल्याची धक्कादायक घटना आज सकाळी घडली. काही क्षणात होत्‍याचे नव्‍हते. (jalgaon-news-crime-news-two-boy-father-fight-and-bit)

निमखेडी शिवारातील कांताई नेत्रालय परिसरात वास्तव्यास असलेले प्रेमसिंग अभिसींग राठोड (वय ५०) हे पत्नी, दोन मुले, दोन मुली यांच्यासह वास्तव्यास होते. ते गेल्‍या काही दिवसांपासून आजारी होते. यामुळे आज सकाळी त्यांची मुले दीपक आणि गोपाळ यांनी दवाखान्यात जाण्याचे सुचविले. मात्र प्रेमसिंग यांनी याला नकार दिला. यावर घरात वाद झाला.

बापाने मुलाला धमकावले अन्‌

वादातूनच प्रेमसिंग यांनी चाकू उगारून मुलांना धमकावले. याप्रसंगी झालेल्या झटापटीत दोन्ही मुलांनी वडिलांवर चाकूने वार करून त्यांना संपविले. काही क्षणांमध्ये झालेल्या या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली. तालुका पोलीस स्थानकाच्या कर्मचार्‍यांनी घटनास्थळी धाव घेऊन दीपक आणि गोपाळ या दोन्ही मुलांना ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Amla beetroot carrot juice: रिकाम्या पोटी आवळा, बीट अन् गाजराचा ज्यूस प्यायलात तर काय होईल? वाचा

Maharashtra News Live Update: अभिजित दिपकेंसह सीपेजीचे ३ नेते कपिल सिब्बल यांच्या निवासस्थानी

Navratri Kamarband Designs : गरबा नाइटसाठी रॉयल लूक! घागरा चोळीवर ट्राय करा कंबरपट्टाचे 'हे' ७ सुंदर डिझाइन्स

8th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! पगारवाढ कधी होणार? एरियर आणि फिटमेंट फॅक्टरबाबत मोठी अपडेट समोर

Blood pressure monitoring: ब्लड प्रेशर घरच्या घरी कसा चेक कराल? जाणून घ्या ७-२-२ चा नियम

SCROLL FOR NEXT