Petrol 
महाराष्ट्र

जळगावातही आता नो व्हॅॉक्सिन, नो पेट्रोल..

जळगावातही आता नो व्हॅॉक्सिन, नो पेट्रोल..

संजय महाजन

जळगाव : कोरोनाचा नवीन व्‍हेरीयंट असलेल्‍या ओमायक्रॉनचा प्रसार वाढण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे. यामुळे कोरोना लसीकरण करण्यावर अधिक भर दिला जात आहे. यामुळे जळगाव महापालिकेने (Jalgaon Corporation) देखील कोरोनाच्‍या लसीचा डोस घेतलेल्‍यांनाच पेट्रोल देण्याचा फतवा काढला आहे.(jalgaon-news-corpoation-rules-follow-today-No-vaccine-no-petrol-in-Jalgaon)

ओमायक्रॉन व्हेरिएंटच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यात व शहरातील विविध आस्थापनांसाठी विशेष नियम लागू केले असून, आता कोरोना लसीकरणाचे सर्टीफिकेट दाखविल्याशिवाय वाहन धारकांना पेट्रोल मिळणार नसल्याचे आदेश मनपा उपायुक्त शाम गोसावी यांनी काढले आहेत.

कडक अंमलबजावणी

शहरातील बँक, हॉटेल व मोठ्या दुकानांसाठीही हेच नियम मनपाने लागू केले आहेत. या नियमांची कडक अंमलबजावणी मनपाकडून आजपासून केली जाणार असल्याची माहिती मनपाप्रशासनाकडून देण्यात आली आहे. राज्यातील मुंबई, पुणे या शहरांमध्ये ओमायक्रॉन व्हेरिएंटचे नवीन रुग्ण आढळले आहेत. त्या पार्श्वभूमीवर मनपाकडून देखील खबरदारी घेतलीआता हॉटेल, बँक, पेट्रोल पंप व मोठ्या दुकानांमध्ये जाताना ग्राहकांकडून लसीकरणाच्या प्रमाणपत्राची तपासणी करून घेण्याचे आदेश मनपाने काढले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Papad Chivda Recipe : शाळेतून आल्यावर मुलांसाठी ५ मिनिटांत बनवा पापड चिवडा, एकदा खाल तर खातच राहाल

Maharashtra Live News Update : नागपूरमध्ये भाजप-शिवसेना युती; सूत्रांची माहिती

Viral Video: झोपेत लोळत लोळत १० व्या मजल्यावरील खिडकीतून खाली पडला, ८ व्या मजल्यावर ग्रीलमध्ये उलटा लटकला, दैव बलवत्तर म्हणून...

ठाकरे घराण्याचा नवा राजकीय प्रयोग, आदित्य-अमित ठाकरे मुंबईत एकत्र; प्रचाराची सूत्रं नव्या पिढीच्या हाती|VIDEO

Pune Politics: अजित पवारांशी युती नकोच! मुंबईनंतर पुण्यातही काँग्रेसचा स्वबळाचा नारा

SCROLL FOR NEXT