Corona 
महाराष्ट्र

सावधान..संसर्ग वाढतोय; जिल्ह्यात नवीन नऊ बाधित

सावधान..संसर्ग वाढतोय; जिल्ह्यात नवीन नऊवारीत

साम टिव्ही ब्युरो

जळगाव : जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात येऊन जिल्हा कोरोनामुक्त होण्याच्या मार्गावर असताना सोमवारी जिल्ह्यात नवे नऊ रुग्ण आढळून आले. त्यापैकी चार रुग्ण जळगाव शहरात, तर तीन रुग्ण एरंडोलमध्ये आढळून आले. यामुळे जिल्ह्यातील सक्रीय रुग्णांची संख्या 17 वर पोहोचली आहे. (jalgaon-news-coronavirus-spred-again-jalgaon-district-news-nine-paitint)

जळगाव जिल्ह्यात जुलैपासून कोरोनाचा संसर्ग आटोक्यात येऊ लागला होता. ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात तो पूर्णपणे नियंत्रणात आला. एकीकडे लसीकरणाचा वेग वाढला असताना नव्याने आढळून येणाऱ्या रुग्णांची संख्या अगदीच नगण्य होती. यामुळे जिल्ह्याची वाटचाल कोरोना मुक्तीकडे होऊ लागली होती.

जळगाव शहरात आढळले रुग्ण

सोमवारी दिवसभरात प्राप्त चाचण्यांच्या अहवालातून जिल्ह्यात नऊ नवे रुग्ण समोर आले. जळगाव शहरातून चार व एरंडोल येथून तीन बाधित आढळून आले. तसेच मुक्ताईनगर व भुसावळ येथून प्रत्येकी एक असे नऊ रुग्ण आढळून आले. सोमवारी अकराशे चाचण्यांचे अहवाल प्राप्त झाले. दिवसभरात दोन रुग्ण बरे झाले. त्यामुळे सध्या जिल्ह्यात सक्रिय रुग्णांची संख्या सतरा असून केवळ एक रुग्ण गंभीर आहे. तो ऑक्सिजन वर आहे.

आतापर्यंत जिल्ह्यात एक 42 हजार 270 रुग्ण आढळले असून एक लाख 40 हजार 176 रुग्ण बरे झाले आहेत. तर 2 हजार 577 बाधितांचा मृत्यू झाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Rain Alert: पुढचे २४ तास महत्त्वाचे! मुंबई, ठाणे, रायगडला रेड अलर्ट; गरज असेल तरच बाहेर पडा

School Holiday Today: पावसाची जोरदार बॅटिंग; मुंबई, ठाण्यासह 'या' ठिकाणी शाळांना सुट्टी; वाचा सविस्तर

Horoscope: घरात येईल सुख-समृद्धि; कोणत्या राशींसाठी आजचा दिवस ठरेल लाभकारी, जाणून घ्या राशीभविष्य

Rajyog 2025: गजकेसरी आणि कलात्मक राजयोगामुळे फळफळणार 'या' राशींचं नशीब; उत्पन्नाचे नवे मार्ग होणार खुले

Crime News: ओळखपत्र,मोबाईल हिसकावला नंतर खांबाला बांधलं; ड्युटीवर निघालेल्या लष्कर जवानासोबत टोल कर्मचाऱ्यांचं संतापजनक कृत्य

SCROLL FOR NEXT