Jalgaon unlock 
महाराष्ट्र

जळगाव जिल्‍ह्यात बाजारपेठ रात्री ८ पर्यंत खुली

जळगाव जिल्‍ह्यात बाजारपेठ रात्री ८ पर्यंत खुली

साम टिव्ही ब्युरो

जळगाव : कोरोना संसर्गाचा दर कमी असलेल्या राज्यातील २५ जिल्ह्यांमध्ये मंगळवारपासून (ता.३) निर्बंध शिथिल होत आहेत. त्यानुसार जळगाव जिल्ह्यातही आता सोमवार ते शुक्रवार सर्व दुकाने रात्री ८ वाजेपर्यंत सुर असतील, तर शनिवारी ती दुपारी ३ पर्यंतच खुली राहणार आहेत. याशिवाय अन्य निर्बंध कायम असतील. (jalgaon-news-coronavirus-jalgaon-district-unlock-proccess-start-today)

राज्यातील २५ जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात असून त्याठिकाणी निर्बंध शिथिल करण्याबाबत प्रस्ताव विचाराधीन होता. त्यासंबंधीचे आदेश आज शासनाने पारित केले. त्यानुसार आता या २५ जिल्ह्यांमध्ये निर्बंध शिथिल झाले आहेत. जळगाव जिल्ह्याचाही त्यात समावेश आहे.

या बाबींचा दिलासा

शासनाच्या आजच्या आदेशानुसार बाजारपेठेतील सर्व दुकानांना मोठा दिलासा मिळाला आहे.

- सर्व प्रकारची दुकाने रात्री ८पर्यंत सुरु राहणार

- शनिवारी ह दुकाने दुपारी ३ पर्यंतच सुरु ठेवता येणार

- रविवारी जीवनावश्‍यक वस्तूवगळता सर्व दुकाने पूर्ण बंद असतील

- उद्यान, पार्क, मैदानांवर केवळ मॉनिंग वॉकसाठी मुभा असेल

- योगा सेंटर, जिम, सलून, स्पा ही ठिकाणे ५० टक्के उपस्थितीसह सुरु ठेवता येतील

- हॉटेल दुपारी ४ वाजेपर्यंतच ५० टक्के क्षमतेसह सुरु राहतील, नंतर पार्सल सुविधा देता येईल

- सर्व प्रार्थनास्थळे, सिनेमागृह, नाट्यगृहे, शाळा, महाविद्यालये बंद असतील

- रात्री ९ ते पहाटे ५ यावेळेत संचारबंदी कायम असेल

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : ऊस दराच्या मागणीसाठी शेतकरी संघटनांचा दिल्लीत एल्गार; आज जंतर-मंतरवर आंदोलन

Mumbai Crime: गार्डमध्ये जाऊन ड्रग्जचं इंजेक्शन घेतलं, मुंबईत तरुणाचा तडफडून मृत्यू

Shadashtak Yog 2026 : ९ ऑक्टोबरपासून धोकादायक योग! ४ राशींवर कोसळणार अडचणींचा डोंगर; तुमची रास तर नाही ना?

जगात पुन्हा लॉकडाऊन लागणार? रशियात लॅबमध्ये 'ती' एक चूक झाली अन् एकाचा मृत्यू; २०० जण क्वारंटाईन

Shreyas Iyer: ‘योग्य वेळ आली की तो राज्य करेल’, वैभव सूर्यवंशीच्या भवितव्याबाबत श्रेयस अय्यरचा मोठा विश्वास

SCROLL FOR NEXT