jalgaon corona update saam tv
महाराष्ट्र

Corona Update: दोन दिवसांतच बाधितांची संख्या दुप्पट; जळगाव, भुसावळात अधिक चिंता

दोन दिवसांतच बाधितांची संख्या दुप्पट; जळगाव, भुसावळात अधिक चिंता

साम टिव्ही ब्युरो

जळगाव : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा कहर आता जळगाव जिल्‍ह्यात देखील जाणवू लागली आहे. मागील आठवड्यात अत्‍यल्‍प असलेली बाधितांची संख्‍या अचानक वाढू लागली आहे. दोन दिवसातच बाधित रुग्ण दुप्पट होताना दिसत आहेत. बुधवारी (ता. ५) जिल्ह्यात तब्बल ३९ नवे रुग्ण (Corona Positive) आढळून आले. त्यामुळे सक्रिय रुग्णसंख्या पुन्हा एकदा शंभरीकडे वाटचाल करतेय. (jalgaon news corona update news number of victims doubled in two days)

जळगाव (Jalgaon) जिल्ह्यात डिसेंबरपर्यंत आटोक्यात असलेल्या कोरोनाबाधितांची संख्या (Jalgaon Corona Update) अचानक वाढू लागली आहे. जानेवारीच्या पहिल्या तारखेपासून जिल्ह्यातील रुग्णसंख्या वाढत आहे. सोमवारी १६, मंगळवारी १३ नवे रुग्ण समोर आल्यानंतर बुधवारी दिवसभरातील नव्या रुग्णांचा आकडा तब्बल तिपटीने वाढून तो ३९वर पोचला आहे.

जळगाव, भुसावळात चिंता

जिल्ह्यात पहिल्या व दुसऱ्या लाटेत हॉटस्पॉट (Corona Hotspot) ठरलेल्या जळगाव शहरासह भुसावळ (Bhusawal) हे या तिसऱ्या लाटेतही सर्वाधिक प्रभावित ठरत आहेत. बुधवारच्या नव्या ३९ रुग्णांमध्ये जळगाव शहरातील तब्बल १७, तर भुसावळ तालुक्यातील ९ रुग्णांचा समावेश आहे. जळगावात आता सक्रिय रुग्णसंख्या ३५ झाली असून, भुसावळात ते २३ वर आहेत. बुधवारी एरंडोल येथे ४, चाळीसगाव तालुक्यात ५ रुग्णांची नोंद झाली.

चाचण्याही वाढल्या

अर्थात, तिसऱ्या लाटेच्या पाश्‍र्वभूमीवर आरोग्य यंत्रणेने चाचण्याही वाढविल्या आहेत. गेल्या चार दिवसांपासून दैनंदिन चाचण्यांची संख्या हजार, पंधराशेवर पोचली. बुधवारी तब्बल २८०४ चाचण्यांचे अहवाल प्राप्त झाले. त्यातून ३९ रुग्ण समोर आले आहेत.

गंभीर रुग्ण अल्प

जिल्ह्यातील सक्रिय रुग्णांची संख्या ९१ वर पोचली असली, तरी त्यात लक्षणे असलेले रुग्ण केवळ १२ आहेत. पैकी दोघेच ऑक्सिजनवर आहेत. त्यामुळे ही बाब दिलासादायक म्हणावी लागेल. सध्या जिल्ह्यातील पॉझिटिव्हीटी रेट दोन टक्क्यांच्या जवळपास आहे.

असे आढळले रुग्ण

दिवस---- चाचण्या--- रुग्ण

१ जानेवारी----२२७०---- ६

२ जानेवारी----१८६५----५

३ जानेवारी-----९७१----१६

४ जानेवारी-----१४६४---१३

५ जानेवारी-----२८०४---३९

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मविआनं सरकारला पाठवलं 15 प्रश्नांचं पत्र; उत्तर देण्याऐवजी मुख्यमंत्र्यांनी काढल्या शुद्धलेखनाच्या चुका

चड्डी बनियान गँग, त्यांनी त्यांची अब्रू वेशीला टांगलीय; एकनाथ शिंदे का भडकले? पाहा VIDEO

Maharashtra Live News Update: कोल्हापुरातील दाजीपूर फोंडा घाट परिसरात तुफान पाऊस

लाडकी बहीण योजना, अजितदादांची आठवण, महाराष्ट्राचा विकास; अधिवेशनच्या पूर्वसंध्येला सुनेत्रा पवार काय म्हणाल्या?

मुख्यमंत्री बदलणार? आमदार एकवटले म्हणाले आम्हाला बदल पाहिजे; 26 फेब्रुवारीला हायकमांड दिल्लीत निर्णय देणार

SCROLL FOR NEXT