Jalgoan corona Update saam tv
महाराष्ट्र

Corona Update: जळगाव, भुसावळ होतेय कोरोना हॉटस्‍पॉट; बाधितांचा आकडा वाढला

जळगाव, भुसावळ कोरोना हॉटस्‍पॉट; बाधितांचा आकडा वाढला

Rajesh Sonwane

जळगाव : जळगाव जिल्ह्यात कोरोनाचा विस्‍फोट झाला असून जळगाव शहरासह भुसावळ कोरोना हॉटस्‍पॉट होवू लाहत आहे. यासोबतच चाळीसगाव तालुक्यात देखील कोरोना रूग्ण संख्येत वाढ झाली असून मागील चोवीस तासात जिल्ह्यात १७९ बाधित रूग्ण (Corona Patient) आढळून आले आहेत. (jalgaon news corona update Jalgaon and Bhusawal Corona Hotspot The number of victims increased)

कोरोनाच्‍या (Corona) पहिल्‍या दोन व आताच्‍या लाटेत मिळून जिल्ह्यात आतापर्यंत एकुण १ लाख ४३ हजार ३०६ बाधित रूग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी १ लाख ४० हजार २५४ बाधित रूग्ण बरे होवून घरी परतले. तर आतापर्यंत एकुण २ हजार ५७८ रूग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. जळगाव (Jalgaon) जिल्ह्यात सध्या ४७३ बाधित रूग्ण विविध कोवीड रूग्णालयात उपचार घेत आहे. आज दिवसभरातून १६ उपचार घेवून घरी गेले आहेत.

भुसावळात सर्वाधिक रूग्ण

जळगाव जिल्ह्यात (Jalgaon Corona Update) दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून आज कोरोनाच्‍या बाधितांचा आकडा पावणे दोनशेच्‍यावर पोहचला आहे. यात सर्वाधिक रुग्ण हे भुसावळ शहरात असून ७३ बाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर जळगाव शहरात कोरोना आकडेवारी वाढली आहे.

असे आढळले बाधित

जळगाव जिल्ह्यात आज दिवसभरात एकुण १७९ कोरोना रूग्ण आढळून आले आहे. यात जळगाव शहरात ६४, जळगाव ग्रामीण ५, भुसावळ ७३, चाळीसगाव १६, अमळनेर १, चोपडा २, पाचोरा २, धरणगाव १, जामनेर ५, रावेर २, मुक्ताईनगर २, बोदवड ५ आणि इतर जिल्ह्यातील १.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Eknath Shinde : मुख्यमंत्रीपदाचा पेच सुटेना, केंद्रीय नेतृत्व मध्यस्थी करणार, एकनाथ शिंदेंना २ ऑफर?

Success Story: सरकारी नोकरी, लंच ब्रेकमध्ये अभ्यास, तिसऱ्या प्रयत्नात UPSC त पहिला; IAS प्रदीप सिंह यांची सक्सेस स्टोरी

Maharashtra News : केंद्राचं महाराष्ट्राला गिफ्ट, २ रेल्वे प्रकल्पांना मंजूरी, शेतकऱ्यांना होणार फायदा

Viral Video: कसं काय पुणेकर! पारा तब्बल १० अंशावर अन् धुक्के; गुलाबी थंडीचा VIDEO पाहाच

Bhiwandi : भिवंडी गूढ धक्क्यांनी हादरली, भूकंप की आणखी काही, शहरात खळबळ

SCROLL FOR NEXT