अवकाळी पाऊस 
महाराष्ट्र

जळगावात अवकाळी पावसाची हजेरी

जळगावात अवकाळी पावसाची हजेरी

संजय महाजन

जळगाव : पंधरा दिवसांपुर्वी झालेल्‍या अवकाळी पावसानंतर जळगावात आज पुन्‍हा अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. यामुळे नागरीकांची चांगलीच तारांबळ उडाली. सकाळपासून ढगाळ वातावरण त्‍यात दुपारी झालेल्‍या पावसामुळे हवेत चांगलाच गारठा जाणवत आहे.

अरबी समुद्र आणि लक्षद्विप येथे कमी दाबाच्या पट्ट्यामुळे अवकाळी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली होती. त्‍यानुसार आज जळगावात अवकाळी पावसाची हजेरी लावल्याने नागरीकांची चांगलीच तारांबळ उडाली आहे. रात्री देखील काही भागात पावसाने हजेरी लावली होती.

सकाळपासून ढगाळ वातावरण

वातावरणात झालेल्या बदलामुळे जळगाव जिल्ह्यात रविवारी मध्यरात्री देखील अवकाळी पावसाने हजेरी लावली होती. जिल्ह्यातील काही भागांमध्ये पाऊस पडला. तर आज सकाळपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण असून, आज देखील पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता. त्‍यानुसार दुपारी दीड वाजेच्‍या सुमारास पावसाने हजेरी लावली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: अत्यल्प उत्पन्नामुळे खचलेल्या शेतकऱ्याने विष प्राशन करून जीवन संपवलं

Lips Care : ओठ सतत फाटून रक्त येतं? 'हा' सॉलिड उपाय करा, लिप्स होतील गुलाबी अन् एकदम सॉफ्ट

बोरिवली आरटीओ आणि मुंबई रायडर्स क्लबतर्फे रस्ता सुरक्षा अभियान, १०० मोटारसायकल रायडर्सचा सहभाग

Tukaram Mundhe : 'मी माझ्या मुलांना कधीच IAS होऊ देणार नाही!' तुकाराम मुंढे स्पष्टच बोलले अन् सांगितलं कारण

Peacock Green Colur Saree Design: महिलांसाठी मोरपंखी कलरच्या साड्यांचे लेटेस्ट कलेक्शन, 5 पॅटर्न्स पाहून खूश व्हाल

SCROLL FOR NEXT