Jalgaon Rasta Roko Saam tv
महाराष्ट्र

Jalgaon Rasta Roko : महामार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य! संतप्त नागरिकांचा प्रशासनाविरोधात रास्ता रोको, वाहतूक विस्कळीत

Jalgaon News : जळगाव शहरातील रस्ते व महामार्गावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. रस्ता ना दूरुस्तीमुळे नियमित अपघात होत आहेत.

संजय महाजन

जळगाव : जळगाव शहरातून गेलेल्या महामार्गावर दोन दिवसांपूर्वी अपघात होऊन दोघांचा मृत्यू झाला. खड्ड्यामुळे हा अपघात झाला असून महामार्गाचे निकृष्ट दर्जाचे काम झाल्याने दोनच वर्षात खड्डे पडले. यामुळे प्रशासनाच्या विरोधात आज उद्धव बाळासाहेब ठाकरे गट व जळगावकर नागरिकांच्या वतीने महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी न्हाईचा निषेध करण्यात आला. 

जळगाव (Jalgaon) शहरातील रस्ते व महामार्गावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. रस्ता ना दूरुस्तीमुळे नियमित अपघात होत आहेत. यापूर्वीही अनेक नागरिकांना आपला जीव गमवावा लागलेला आहे. तर काहींना कायमस्वरुपी अपंगत्व आले आहे. अवघ्या दोन वर्षात महामार्ग (NHAI) खराब झाला असून निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्यांवर तातडीने कार्यवाही व योग्य उपाय योजना करावी; अशी मागणी जळगावकर नागरिकानी जन आक्रोष मोर्चाद्वारे निवेदनद्वारे केली.

पायी चालत केला निषेध 
जळगाव शहरातील मानराज पार्कजवळ २८ ऑगस्टला झालेल्या अपघातामध्ये दोन जणांचा जीव गेला होता. या रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी आज जळगावकर नागरिक जळगाव महापालिकेचे माजी उपमहापौर कुलभूषण पाटील, उद्धव ठाकरे गटाचे पदाधिकारी यांच्यासह अनेक नागरिक यांनी खोटेनगर ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत पायी चालत आंदोलन केले. यावेळी न्हाईचा निषेध करून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kitchen Hacks : लाकडी चॉपिंग बोर्ड धुतल्यानंतरही दुर्गंधी येतेय? या घरगुती उपायांनी करा डीप क्लीन

Weight Loss : लाइफस्टाइलमध्ये करा 'हे' ३ बदल; फक्त ३० दिवसांत वजन होईल कमी अन् दिसाल सडपातळ

Maharashtra News Live Update: दहीहंडीत अश्लील नृत्य; डान्सर निशा मुंबईकर, शुभांगी थोरातसह ८ जणींवर गुन्हा

8th Pay Commission: केंद्रीय पेन्शनधारकांसाठी मोठी बातमी! ₹22,450 पेन्शन वाढून ₹57,697 होणार? जाणून घ्या संपूर्ण गणित

IAS Transfer : मोठा प्रशासकीय फेरबदल! २७ IAS अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या, कुणाची कुठे नियुक्ती? वाचा

SCROLL FOR NEXT