Jalgaon News, gardening tips and tricks, gardening at home
Jalgaon News, gardening tips and tricks, gardening at home Saam tv
महाराष्ट्र

घराच्या छतावर फुलवली आकर्षक बाग; टाकाऊ वस्तूचा वापर करत आकर्षक सजावट

संजय महाजन

जळगाव : जळगावात असं एक घर आहे; त्या घरात फुलांसह विविध झाडांनी नटलेली सुंदर बाग. टाकाऊ वस्तूंचा वापर करत विद्युत रोषणाईसह केलेली आकर्षक सजावट अन् झोपडी सुध्दा आहे. लाईटस् म्युझिक अन् सर्व काही असलेले असं हे घर व त्यातील नयनरम्य नजारा पाहण्यासारखा आहे. (jalgaon news chirmade family Attractive garden with flowers on the roof of the house)

घरातील जागेचा वापर कसा करायचा याच एक उत्तम उदाहरण म्हणजे मनीष चिरमाडे यांचे हे जळगावातील (Jalgaon) घर. अनेकजण घरात प्रसन्न वाटाव, सुंदर वाटांव म्हणून इंटेरीयरवर हजारो लाखो रुपये खर्च करतात. मात्र चिरमाडे यांनी घरच्या घरीच टाकाऊ वस्तूंचा वापर करत, शक्कल लढवित घराच्या सौदंर्यांत भर घालती. घराच्या (Home) प्रवेशव्दारापासून ते घराच्या छतापर्यंत मिळेल त्या जागेवर फुलांची असो की वन औषधींची हिरवीगार, टवटवीत, मनमोहक अशी सुंदर झाडे आहेत. घरात प्रवेश करतांना आपण एखाद्या बागेतच प्रवेश करतोय, अशी अनुभूती येते. झाडांबरोबरच आकर्षक अशी बांबूपासून बनविलेली झोपडी, जुन्या काळातील कंदील, टाकाऊ वस्तूंचा वापर करत केलेली सजावट, विद्युत रोषणाई यामुळे हे घर आहे, की एखाद्या पर्यटनस्थळी किंवार हिल स्टेशनवर असलेले हॉटेल आहे; असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही.

बाहेरील राज्‍यातून झाडे आणून लावली

मनीष चिरमाडे यांनी शहरात मिळेल ती झाड तर लावली. मात्र काही झाड ही बाहेरील राज्यातून सुध्दा मागविली आहेत. झाडांना वेळच्या वेळी मुबलक पाणी देता यावे म्हणून पाण्याचेही उत्कृष्टरित्या नियोजन चिरमाडे यांनी केले आहे. पाणी वाया जाणार नाही, याची काळजी घेत, प्रवेशव्दारापासून ते घराच्या छतापर्यंत असलेल्या प्रत्येक झाडापर्यंत ठिबक सिंचनप्रमाणे पाणी देण्याची व्यवस्था केली. बटन दाबलं की प्रत्येक झाडापर्यंत पाणी पोहचत. विशेष म्हणजे या झाडांमध्ये एक पक्षांसाठी छोंटंस आकर्षक अस घरही उभारलंय, याच ठिकाणी उत्कृष्ट पध्दतीने भिंती रंगविलेल्या असून या भिंतीवर अदृश्य स्वरुपात स्पिकरही लावला.

सौदर्यातही भर

घराची सजावट, निसर्गरम्य अन् सुंदर करण्यासाठी लाखो रुपये खर्च करावे लागतात. असं जर कुणी म्हणत असेल, तर मनीष चिरमाडे हे त्याला अपवाद ठरले आहेत. तुज आहे, तुज पाशी परी तु जागा भुललासी याप्रमाणे सर्व गोष्टी या आपल्याजवळ असतात. मात्र आपण त्याकडे लक्ष देत नाही. छोटीशी शक्कल लढविली आणि मेहनत घेतली तर पर्यावरण संवर्धनही करता येते. टाकाऊ वस्तूंपासून घराच्या सौदर्यांतही भर घालता येते, हे मनीष चिरमाडे यांनी यातून दाखवून दिलं आहे. बाहेर कुठलाही मौसम असो, मात्र या घरात बाराही महिने मौसम हा मस्तानाच असतो. पर्यावरणाची उत्कृष्ट सांगड आणि प्रसन्न वातावरण, ताणतणाव दूर करणाऱ्या या घराची जळगावात तर चर्चा होणारच.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Horoscope Today: आजचे राशिभविष्य, मेषसह ४ राशींसाठी ‘शनिवार’ भाग्याचा; फक्त 'या' गोष्टीची घ्या काळजी

Cibil Score: कमी झालेला सिबिल स्कोअर ७०० पार कसा कराल? 'या' टिप्स सुधारतील तुमचा स्कोअर

Ankita Lokhande: हृदयस्पर्शी कॅप्शनसह अंकिता लोखंडेने पतीसोबतचा रुग्णालयातील फोटो केला शेअर

Maharashatra Elction: कोकणात ठाकरे विरुद्ध ठाकरे लढाई; उद्धव आणि राज ठाकरेंच्या सभांचा झंजावात

Petrol वर नाही CNG वर धावणार Bajaj ची नविन बाईक, Platina पेक्षा देणार जास्त मायलेज

SCROLL FOR NEXT