Chalisgaon News
Chalisgaon News Saam tv
महाराष्ट्र

Chalisgaon News: बिबट्याचे पशुधनावर हल्ले सुरूच; वासरीचा पाडला फडशा

साम टिव्ही ब्युरो

मेहुणबारे (जळगाव) : मेहूणबारे (ता.चाळीसगाव) शिवारात बिबट्याचे पशुधनावर हल्ले सुरूच आहेत. आज पहाटे पुन्हा बिबट्याने (Leopard) कपाशीच्या शेतात गुरांमध्ये बांधलेली वासरी बिबट्याने हजार फूट फरफटत नेत तिचा बळी घेतला. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. वन विभागाने (Forest Department) घटनेचा पंचनामा केला आहे. (Breaking Marathi News)

वरखेडे- मेहूणबारे रस्त्यावरील वाघी नाल्याच्या रस्त्यापुढे असलेल्या भूषण संदीप चौधरी यांच्या शेतात गोठ्यातून दहा दिवसापूर्वी एक गाय दोर कापून चोरीस गेल्याची घटना घडली होती. त्यानंतर चौधरी यांनी आपली सर्व गुरे बाजुला असलेल्या कपाशीच्या शेतात बांधलेली होती. आज सकाळी चौधरी हे नेहमीप्रमाणे शेतात गेले असता इतर गुरांजवळ बांधलेली असलेली वासरी कुठेही दिसून आली नाही. शोध घेतला असता काही अंतरावर वासरी मृत अवस्थेत मिळून आली. बिबट्याने वासरूला (Leopard Attack) फरफटत नेत तिचे नरडे फोडल्याचे दिसून आले. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर वनरक्षक संजय चव्हाण यांनी घटनास्थळी येवून पंचनामा केला.

आठ दिवसांपुर्वीच बकरीला मारले

आठ– दहा दिवसांपूर्वीही वरखेडे शिवरातही बिबट्याने एका बकरीचा फडशा पाडल्याची घटना घडली होती. शेतात बांधलेल्या गुरांना बंदिस्त जागेत बांधावीत असे आवाहन वन विभागाकडून करण्यात आले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Election: महायुतीचा ५ जागांचा तिढा सुटला? पण नाशिकचा सस्पेन्स कायम

Dombivli Local Train Accident : डोंबिवलीतील तरुणीचा लोकलमधून पडून दुर्दैवी मृत्यू

Today's Marathi News Live : आदित्य ठाकरेंचा उद्या श्रीकांत शिंदेंच्या मतदारसंघात रोड शो

Supriya Sule on Onion | कांदा निर्यातीवर सुळे यांचा केंद्र सरकारला सवाल

Vasant More Election symbol : झोप उडवणार! वसंत मोरेंना निवडणूक चिन्ह मिळताच विरोधकांना दिला थेट इशारा

SCROLL FOR NEXT